एशियाटिकची निवडणूक ४ जुलै रोजी! मतदान कोण करु शकतो? काय आहेत नियम व अटी? - A to Z माहिती

    11-Jun-2026
Total Views |
Asiatic Election Voting
 
मुंबई (Asiatic Election Voting Guide) : मतदार यादीतील गोंधळामुळे मागची अनेक महिने रखडलेली एशियाटिक सोसायटीच्या निवडणूकीला अखेर आशेचा किरण गवसला आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या विविध पदांसाठी अखेर शनिवार दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते ४ या कालावधीमध्ये एशियाटिक सोसायटीच्या मुंबईच्या कार्यलयात संपन्न होणार असल्याची माहिती एशियाटिकच्या उपसमितीने दिली. त्याचबरोबर संस्थेची निवडणूकीसाठीची अंतिम मतदार यादी संस्थेच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली असून, ती सोसायटीच्या नोटीस बोर्डावर सुद्धा लावण्यात आलेली आहे.(Asiatic Election Voting Guide)
 
मागच्या काही काळापासून नवमतदारांच्या संख्येवरुन एशियाटिकची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आधी धर्मादाय आयुक्त आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयापर्यंत सदर प्रकरण गेले. एप्रिल महिन्यात या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत स्पष्ट केले की ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या मतदारयादीनुसारच एशियाटिकची निवडणूक पार पडणार आहे. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या निकालाला स्थगिती देण्यासही उच्च न्यायलयाने नकार दिला. या निकालानंतर एशियाटिक टुमॉरो गटाच्या माध्यमातून कुठलाही विलंब न करता, निवडणूक ताबडतोब घेतली जावी अशी मागणी करण्यात आली होती. या संदर्भात एशियाटिकचे माजी उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले होते की "न्यायालयाचा निकाल म्हणजे एशियाटिक सोसायटीला अधिक समावेशक व सक्रिय संस्था बनवण्याच्या आमच्या भूमिकेवर आणि आमच्या सुधारणांच्या अजेंडावर उमटलेली पसंतीची गोहोरच आहे." अर्ध्यावर राहिलेली निवडणूक प्रक्रिया पुढे चालू राहणार असल्यामुळे नव्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.एशियाटिक सोसायटीच्या १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यात ही निवडणूक रंगणार आहे.(Asiatic Election Voting Guide)

एशियाटिकसाठी मतदान कोण करु शकतो?
 
काही दिवसांपूर्वी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या संकेत स्थळावर अद्यावत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुधारित मतदार याद्यांमध्ये २५१० मतदार असून निवडणूक जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंतचे म्हणजे २७सप्टेंबर पर्यंतच्या अर्जदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे.सुधारीत याद्यांवर १५ दिवसांच्या आत हरकती व सूचना संस्था कार्यालयात प्रत्यक्ष द्याव्यात, असे आवाहन समितीने केले होते. या पार्श्वभूमीवर एकूण ५८ हरकती नोंदवण्यात आल्या. ज्यातील ७ गैरलागू होत्या. ३१ अपूर्ण माहितीमुळे नाकारण्यात आल्या आणि उर्वरित २० हरकतींवर कार्यवाही केली असल्याची माहिती उपसमितीने दिली.(Asiatic Election Voting Guide)