सुमन काळे प्रकरणाच्या फेरतपासास गती; एसआयटी चौकशीबाबत सकारात्मक प्रतिसाद

    10-Jun-2026   
Total Views |
Suman Kale Case
 
मुंबई : (Suman Kale Case) पारधी समाजसेविका स्वर्गीय सुमन काळे यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकभवन येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रकरणाची फेरतपासणी अथवा विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली.
 
या शिष्टमंडळात पद्मश्री गिरीश प्रभुणे, विवेक विचार मंचचे राज्य संयोजक सागर शिंदे, स्वर्गीय सुमन काळे यांचे बंधू गिरीश चव्हाण, पुत्र साहेबा काळे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अशोक तिडके तसेच विवेक विचार मंचचे प्रांत संयोजक निलेश धायरकर आदी उपस्थित होते.
 
भेटीदरम्यान शिष्टमंडळाने सुमन काळे प्रकरणातील तपासातील विलंब, तपास प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंका तसेच पीडित कुटुंबाच्या न्यायाच्या मागणीसंदर्भात सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी या प्रकरणाची फेरचौकशी अथवा विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.(Suman Kale Case)
 
स्वर्गीय सुमन काळे प्रकरणात मागील १९ वर्षांपासून कुटुंबीयांकडून न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, या घडामोडींना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे.(Suman Kale Case) 
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.