पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्द पूर्तिनिमित श्री सिद्धिविनायक मंदिरात विशेष प्रार्थनेचे आयोजन

    10-Jun-2026
Total Views |
Prime Minister Narendra Modi
 
मुंबई : (Prime Minister Narendra Modi) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सर्वाधिक दिवस देशसेवा करण्याचा अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल बुधवार दि. १० रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात विशेष प्रार्थना व महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विधी अत्यंत भक्तीभावाने संपन्न झाला.
 
"यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, तसेच भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या त्यांच्या संकल्पपूर्तीसाठी बाप्पाने त्यांना शक्ती द्यावी आणि ते पुढेही देशाचे यशस्वी नेतृत्व करत राहावेत, यासाठी श्री सिद्धिविनायक चरणी साकडे घालण्यात आले." अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिली.
 
हेही वाचा :  महायुती सरकार श्रद्धास्थानांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पिंपळेश्वर देवस्थानाचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
 
या मंगलप्रसंगी भाजप मुंबईचे महामंत्री तथा श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी , भाजप मुंबईचे सचिव तथा मंदिर न्यासाचे विश्वस्त. जितेंद्र राऊत आणि भाजप मुंबई कार्यकारिणी सदस्य तथा मंदिर न्यासाचे विश्वस्त महेश मुदलियार, मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती योजना ठोकळे , महिला मोर्चा पदाधिकारी, भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Prime Minister Narendra Modi)