पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी; दिवेअंजुर येथे उत्साहात महाआरती

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पूजा

    10-Jun-2026
Total Views |
Dive Anjur Maha-Aarti
 
भिवंडी : (Dive Anjur Maha-Aarti) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्तीनिमित्ताने माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते दिवेअंजुर येथील श्री शिवशंकर मंदिरात मनोभावे पूजा करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान म्हणून गौरव प्राप्त केला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्याबरोबरच उज्ज्वल भविष्यासाठी महाआरती करण्याचा उपक्रम भाजपकडून राबविण्यात येत आहे. त्यानुसार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिवेअंजुर येथील मंदिरात पूजा आयोजित केली होती.
 
श्री गणेश, श्री शिवशंकराकडे मनोभावे प्रार्थना करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आशीर्वाद मागण्यात आले. भारताच्या प्रगतीसाठी उत्तम आरोग्य लाभो, तसेच जगाला शांतीचा मार्ग दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बळ मिळो, यासाठी साकडे घालण्यात आले. तसेच उत्साहात महाआरती पार पडली.
 
या कार्यक्रमाला माजी आमदार पांडुरंग बरोरा, भाजपचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, प्रशांत पाटील, देवेश पाटील, पी. के. म्हात्रे, सुधाकर म्हात्रे, श्रीधर पाटील आदींसह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.(Dive Anjur Maha-Aarti)