भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले - एकनाथ शिंदे

    10-Jun-2026
Total Views |
Eknath Shinde
 
मुंबई : (Eknath Shinde) "भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.११ व्या नंबर वरून देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर गेली आहे.ती तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा, आत्मनिर्भर , विकसित भारताचा संकल्प करून वेगळी ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केली आहे.देशातील महिला, शेतकरी यांसह सर्वांना आत्मसन्मान देण्याचं काम केलं.२०१४ पूर्वीच्या यू पी ए सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले.
 
२ जी स्पेक्ट्रम, कोळसा,चारा घोटाळासारखे खूप भ्रष्टाचाराचे घोटाळे झाले.पण मोदी सरकारच्या १२ वर्षाच्या काळात एकही असा आरोप झाला नाही.तसेच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाच्या विरोधकांना धडा देण्याचे एक उत्तम उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात समोर आले आहे."असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवार दि.९ रोजी केले.मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.
 
हेही वाचा :  महाराष्ट्र सरकारचे ४ महत्त्वाचे निर्णय; मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना, नवीन महाविद्यालयांना मंजुरी...
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून असा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत.की यानंतर त्यांच्याएवढा कार्यकाळ कोण पूर्णच करू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहणारे नेते ठरणार आहेत." अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार दि.९ रोजी माध्यमांशी बोलताना दिली.
 
"१ कोटी ५१ लाख सदस्य संख्या असलेली महाराष्ट्राची भाजप आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप.कोण अतिउत्साही आमचे शटर बंद करायला निघाले असतील तर हा फारच बालिशपणा आहे. काँग्रेस पक्षातच इतकी गटबाजी आहे की त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांचं शटर बंद करतील. आमचे नागपूरचे नगरसेवक स्वतःचे पैसे खर्च करून स्वखर्चाने पक्षाच्या प्रशिक्षणाला बाहेर गावी जात आहेत.ही चांगली गोष्ट आहे."असेही बावनकुळे म्हणाले. (Eknath Shinde)
 
"अतिक्रमण झालेले महसुल विभागाचे नाले पूर्ववत करणे ही भूमिका आहे याकरता एक स्पेशल टास्क कार्यक्रम राबवणार आहोत.राज्यातील पाणंद रस्ते, शेतकऱ्याचे पाणंद रस्ते आणि शेतकऱ्याचे महसूली नाले पूर्ववत करणे हे महसूल विभागाचे काम आहे.तसेच पुरहानी महसूली रस्ते बुजल्याने होत आहे ते पूर्ववत करण्याची योजना आहे ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पूरहानी होणार नाही." असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)