शेतकऱ्यांचा खरा भाऊ म्हणजे देवाभाऊ आहेत - नवनाथ बन
10-Jun-2026
Total Views |
मुंबई (Devendra Fadnavis farmers political statement) : लातूरमधील शेतकरी प्रकरणाचा उल्लेख करताना नवनाथ बन म्हणाले की,"घटना समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रशासनाला सूचना करून मदत पोहोचवली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, मोफत वीज, कृषी पंप आणि विविध योजनांच्या माध्यमातून महायुती सरकारने ठोस काम केले असून शेतकऱ्यांचा खरा भाऊ म्हणजे “देवाभाऊ” आहेत." बुधवार दि.१० रोजी भाजप प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन बोलत होते.(Devendra Fadnavis farmers political statement)
" मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली असून राम मंदिर उभारणी, थेट लाभ हस्तांतरण, गरीब कल्याण योजना आणि दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका यामुळे देशात सकारात्मक बदल घडले आहेत."असे बन यांनी सांगितले.
बन यांनी संजय राऊत यांच्या काँग्रेसबाबतच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. "तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे सांगणाऱ्या राऊत यांच्या पोटातले आता ओठावर आले आहे. येत्या काळात उबाठा गटालाही काँग्रेसमध्ये विलीन करण्याची भूमिका राऊत घेतील. राहुल गांधींची सुपारी घेऊन काँग्रेसबाहेरील उबाठा आणि पवार गट संपवण्याचे काम राऊत करत आहेत." असा घणाघात बन यांनी केला.राशीद अल्वी आणि संजय राऊत यांची भाषा एकसारखी असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. काँग्रेसची भूमिका महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम राऊत करत असून ते काँग्रेसचे अनधिकृत प्रवक्ते बनल्याचा आरोप त्यांनी केला. (Devendra Fadnavis farmers political statement)
"उबाठा गटाचे अस्तित्व संपुष्टात येत असून लोकसभेतील नऊ खासदार आणि राज्यसभेतील संजय राऊत यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते वेगवेगळ्या राजकीय वाटा स्वीकारतील.काही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, तर काही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील." असा दावाही बन यांनी केला.
अमित शहांविरोधातील संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन म्हणाले की, "मोदी लाट आणि जनतेच्या सुनामीत उबाठा गटाचे अस्तित्व जवळपास संपले आहे.अशा वेळी अमित शहांवर टीका करण्याऐवजी राऊत यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे. देशाने अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांची राजकीय ताकद विरोधकांना सतत अस्वस्थ करत आहे." (Devendra Fadnavis farmers political statement)
नारी सन्मान आणि नारीशक्ती वंदन विधेयकाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर नवनाथ बन यांनी टीका केली. "महिलांचा सन्मान न करणाऱ्या आणि महिलांना धमक्या देणाऱ्यांना नारी सन्मानाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. जनतेने निवडणुकीत उबाठा गटाला नाकारत त्यांची राजकीय घंटा वाजवली असल्याचा टोला बन यांनी लगावला. (Devendra Fadnavis farmers political statement)