समोर लढायला उरलंय कोण प्रश्न पडतो - नितेश राणे

    01-Jun-2026
Total Views |
Vidhan Parishad Election News Maharashtra
 
मुंबई : (Vidhan Parishad Election News Maharashtra) "समोर लढायला उरलय कोण हा प्रश्न पडतो. व्यासपीठाकडे पाहिल्यानंतर पूर्ण कोकण दिसते.त्यामुळे निवडणूक करायची गरज आहे का हा देखील प्रश्न पडतो. उरलं सुरलं कोण आहे त्याच्यावर दुर्बिणीने लक्ष घालणार आहे.२२ तारखेला जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा आकड्यांमध्ये तटकरे यांनी मोजून घ्यावे की भाजपचा सिंहाचा वाटा असेल." असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवार दि.१ रोजी केले. महायुतीच्या वतीने रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात ते बोलत होते.
 
"महायुती म्हणून आम्ही विधानपरिषद निवडणूक लढत असताना मी आत्मविश्वासाने सांगेन की १७ जागा आम्ही जिंकू. विरोधकांना एक सुद्धा जागा जिंकता येणार नाही. लोकांचा विश्वास महायुतीवर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आहे.
 
या निवडणुकीत याला वगळल त्याला वगळल असे कुठेही झाले नाही. सर्वानुमते जागा वाटपाबाबत दिल्लीत निर्णय झालेला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मताने जळगावची जागा आम्ही निवडून आणु."अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषद निवडणूक संदर्भात माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Vidhan Parishad Election News Maharashtra)