मुंबई : (Surya Murder Case) मैत्रीच्या नावाखाली एखाद्याची हत्या करणे किंवा चाकू भोसकणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही", असा स्पष्ट इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलाय. उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या खोडा परिसरात १७ वर्षीय सूर्या तरुणाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. बिजनौर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुन्हेगारांसह पालकांनाही इशारा दिला. आपल्या मुलांच्या चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करणारे पालक मोठी चूक करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, अहिंसा आणि मानवता ही समाजाची अलंकारे आहेत. मात्र अन्याय आणि गुन्हेगारीसमोर कठोर कारवाई करणे आवश्यक असते. हिंदू पुराणातील खर-दूषण यांच्या संदर्भाचा उल्लेख करत त्यांनी कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचे स्पष्ट केले. सूर्या हत्येप्रकरणानंतर उत्तर प्रदेशात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, या प्रकरणात सरकारकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.(Surya Murder Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक