मीरा-भाईंदर परिसरात केरळ स्टोरीची पुनरावृत्ती!;जिहादी शब्बास शेख विरोधात गुन्हा दाखल

    01-Jun-2026   
Total Views |
Mira-Bhayandar Case
 
मुंबई : (Mira-Bhayandar Case) मीरा-भाईंदर परिसरातील एका हिंदू महिलेने शब्बास रज्जाक शेख या जिहादी मुस्लिम युवकाविरुद्ध आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध छळ, मारहाण तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे काशिमीरा परिसरातील काशिगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
 
महिलेच्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये मालाड येथील एका खासगी कंपनीत काम करत असताना तिची ओळख शब्बास रज्जाक शेख याच्याशी झाली. कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. महिलेचा आरोप आहे की, २०२३ मध्ये शब्बासने तिच्याशी विवाह करण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
महिलेने पुढे सांगितले की, त्यानंतर दोघे मीरा रोड (Mira-Bhayandar Case) परिसरातील भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. या काळात ती दोन वेळा गर्भवती राहिली. मात्र, शब्बासने तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा तसेच विवाहासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट घालत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप तिने केला.
 
 
तक्रारीनुसार, २८ मे रोजी महिला आरोपीच्या घरी गेली असता त्याच्या कुटुंबीयांनी तिची मारहाण केली. या प्रकरणात तिने आरोपीच्या कुटुंबीयांचीही नावे तक्रारीत नमूद केली असून त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. काशिगाव पोलिसांनी शब्बास रज्जाक शेख आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ३१३, ३७६(२)(ड), ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व तथ्यांची पडताळणी झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 
जोपर्यंत हिंदू कुटुंबे आपल्या मुलींमध्ये सनातन धर्म, कुटुंबसंस्कार आणि परिवाराविषयी आत्मीयता व अभिमान जागृत करत नाहीत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. आता वेळ आली आहे—पुढील पिढीला धर्मनिष्ठ, संस्कारित आणि कुटुंबाभिमानी घडविण्याची. हेच आजचे सर्वात मोठे आव्हान आणि कर्तव्य आहे.
 
- नागनाथ कांबळे, जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, भाईंदर जिल्हा (Mira-Bhayandar Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक