डोंबिवली बँक परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण !!!
01-Jun-2026
Total Views |
डोंबिवली : (Dombivli Nagari Sahakari Bank) डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नागरी सहकारी बँक क्षेत्रासाठी मॉडेल बाय लॉ तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
ही मानाची नियुक्ती म्हणजे ॲड. धारगळकर यांच्या समृद्ध अनुभवाची, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची आणि सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाची पावती आहे. तसेच डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. साठीही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट असून राष्ट्रीय स्तरावर बँकेची वाढती प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता अधोरेखित करणारी आहे.
या समितीवर नागरी सहकारी बँकांसाठी अद्ययावत नमुना उपविधी तयार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या उपविधींमुळे बँकांचे कामकाज अधिक पारदर्शक, नियमबद्ध आणि प्रभावी होण्यास मदत होईल.
बँकेचे संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ, बँक अधिकारी , कर्मचारी आणि संपूर्ण डोंबिवली बँक परिवाराच्या वतीने अध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले.(Dombivli Nagari Sahakari Bank)