ऑरेंज गेट टनेल प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश

एमएमआरडीएकडून मुंबईच्या भूमिगत रस्ते प्रकल्पाला गती; 250 मीटर भूमिगत बोगदा खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण

Total Views |
Orange Gate Tunnel Project
 
मुंबई : (Orange Gate Tunnel Project) ऑरेंज गेट भूमिगत रस्ता बोगदा प्रकल्पात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक मोठा अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे. प्राधिकरणाने अत्याधुनिक स्लरी शिल्ड टनेल बोरिंग मशीन (TBM) तंत्रज्ञानाचा वापर करून अंदाजे 250 मीटर भूमिगत बोगदा खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण केले असून, त्यासोबत कायमस्वरूपी सेगमेंट टनेल लाइनिंग रिंग्स उभारणीही पूर्ण केली आहे.
 
ऑरेंज गेट टनेल प्रकल्प हा मुंबईसाठी बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या एमएमआरडीएच्या व्यापक दृष्टीकोनाचा भाग म्हणून विकसित केला जात आहे. याठिकाणी उन्नत मार्गिका, मेट्रो प्रणाली, किनारी पायाभूत सुविधा आणि भूमिगत रस्ता नेटवर्क हे वेगाने विस्तारत असलेल्या जागतिक महानगरासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्था असतील. हा बोगदा अखंड पूर्व–पश्चिम संपर्क निर्माण करण्यासाठी, प्रवास कार्यक्षमतेत मोठी सुधारणा घडवण्यासाठी आणि प्रमुख वाहतूक मार्गांवरील ताण कमी करण्यासाठी विकसित केला जात आहे.(Orange Gate Tunnel Project)
 
 
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले,“देशातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या शहरात खोल भूमिगत बोगदा खोदकाम करणे हे अत्यंत कठीण आहे. आज गाठलेला टप्पा या परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध प्रगतीचे प्रतीक आहे.”(Orange Gate Tunnel Project)
 
टनेल बोरिंग मशीन तपशील
 
प्रकार : स्लरी शिल्ड टीबीएम
कटर हेड व्यास : 12.19 मीटर
⁠लांबी : 80 मीटर
वजन : अंदाजे 2,400 टन
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.