‘टेक-वारी २.०’ अंतर्गत मंत्रालयात विविध नृत्याविष्कार सादर

    09-May-2026   
Total Views |
Ministry Event Mumbai
 
मुंबई : (Ministry Event Mumbai) सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक-वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात शेवटच्या दिवशी संस्कृतीरंग कार्यक्रमातून विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले.
 
दि. ४ ते ८ मे २०२६ या कालावधीत ‘टेक- वारी २.०’ अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रम झाला. शुक्रवारी, शेवटच्या दिवशी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. संध्या पुरेचा संगीत नाटक अकादमीच्या टीमने संस्कृतीरंग कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, महाराष्ट्र सदन नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमला, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी मिनाक्षी अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.(Ministry Event Mumbai)
 
 
कार्यक्रमात गणेशवंदन, शास्त्रीय संगीत नृत्य, ओडिसी, भरतनाट्यम, शिवस्तुती, बाल्या, पंढरपूर वारी यासह विविध अभंगावर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. सादरीकरणातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, भावविश्व आणि कलात्मकता प्रभावीपणे उलगडण्यात आली.(Ministry Event Mumbai)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....