मुंबई : (India Defence) संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर काम करणारी मुंबईतील अग्रगण्य संस्था 'ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन'तर्फे सोमवार, ११ मे २०२६ रोजी वांद्रे (पश्चिम) येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) संधी’ या विषयावर एका महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाच्या सहकार्याने आयोजित या चर्चासत्राचा मुख्य विषय ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ असा असून, हे चर्चासत्र ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे. भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत एमएसएमईसाठी निर्माण होणाऱ्या अभूतपूर्व संधींवर प्रकाश टाकणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या चर्चासत्रात संरक्षण क्षेत्रातील धोरणकर्ते, वरिष्ठ लष्करी नेतृत्व, सरकारी अधिकारी, जागतिक संरक्षण उत्पादक, वित्तीय संस्था आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज एकत्र येणार आहेत. भारत सरकारच्या 'संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता' उपक्रमांतर्गत येणाऱ्या दशकात भारतीय एमएसएमईसाठी सुमारे १० लाख कोटी रुपयांची व्यवसायाची संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.(India Defence)
महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन पार पडणार असून याप्रसंगी ‘संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावरील एका विशेष पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.(India Defence)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....