महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला आयएसओ नामांकन

Total Views |
Digital Innovation India
 
मुंबई : (Digital innovation India) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट कामांबद्दल आयएसओ नामांकन मिळाले. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभागाने हे यश मिळविले आहे. जनसंपर्क विभागामध्ये महाराष्ट्रात आयएसओ नामांकन मिळविणारा महापारेषणचा जनसंपर्क विभाग पहिलाच ठरला आहे.
 
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत अनेक अभिनव उपक्रम राबविले आहेत. ‘महापारेषण समाचार’ या गृहमासिकेमध्ये क्यू-आर कोड, पॉडकास्ट आणि डिजिटल संवाद तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती सादरीकरणाला आधुनिक रूप दिले. जाहिराती आणि जनजागृती मोहिमांमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणारा हा विभाग राज्यातील अग्रगण्य विभाग म्हणून ओळखला जातो.
 
विशेष म्हणजे, जनसंपर्क क्षेत्रात तब्बल १५ पुरस्कार पटकाविण्याचा विक्रमही महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने आपल्या नावावर केला आहे. आयएसओ नामांकनामुळे महापारेषणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 
 
दरम्यान, महापारेषणच्या जनसंपर्क विभागाचे आयएसओ नामांकनचे प्रमाणपत्र लेखानिबंधक विजयकुमार स्वामी यांनी अपर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजू गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, जनसंपर्क विभागाचे श्रीकांत जाधव उपस्थित होते.(Digital innovation India)
 
जनसंपर्क विभाग अग्रेसर : डॉ. संजीव कुमार
 
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी यशाचे संपूर्ण श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने सकारात्मक बदल केले. विशेषतः सोशल मीडियाव्दारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, टेलिग्राम, थ्रेडस) जनसंपर्क विभागाने महापारेषणची भूमिका लोकांसमोर सकारात्मकपणे ठळकपणे मांडली. (Digital innovation India)
 
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.