नालेस्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण करावीत; मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

पश्चिम उपनगरांतील नालेस्वच्छतेच्या कामांचा प्रत्यक्ष पाहणी करत घेतला आढावा

    08-May-2026
Total Views |
Mangal Prabhat Lodha
 
मुंबई : (Mangalprabhat Lodha Inspection) मुंबईतील नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. तथापि, ही कामे वेळेत आणि योग्यप्रकारे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
 
पश्चिम उपनगरातील साऊथ अवेन्यू नाला, गझधरबंध नाला, एसएनडीटी नाला, गझधर पंपिंग स्टेशन, रसराज नाला, मिलेनियम क्लब नाला, जुहू पी. व्ही. आर. नाला, जुहू – वेसावे (वर्सोवा) जोड मार्ग नाला, वीरा देसाई मार्ग नाला, मोगरा नाला, शहीद भगतसिंग नगर नाला आदी नाल्यांची आज दि ८ मे रोजी सह पालकमंत्री लोढा यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला.(Mangalprabhat Lodha Inspection)
 
आमदार अमीत साटम, सभागृह नेता गणेश खणकर, नगरसेवक विठ्ठल बंदेरी, नगरसेवक दीपक कोतेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे, उप आयुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या विभाग) सुनील रसाळ, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या विभाग) रमाकांत मोरे आदी यावेळी उपस्थित होते. नालेस्वच्छतेच्या एकंदरीत प्रगतीबाबत मंत्री लोढा आणि आमदार साटम यांनी समाधान व्यक्त केले.(Mangalprabhat Lodha Inspection)
 
हेही वाचा :  AI उपयुक्त, पण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’; ‘टेक वारी २.०’ कार्यक्रमातील ‘कलारंग : आर्ट, एआय अँड गव्हर्नन्स’ परिसंवादात मान्यवरांचे मत
 
आमदार अमीत साटम यावेळी म्हणाले की, मुंबईतील विविध नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून सुरू आहेत. नालेस्वच्छतेच्या कामांची प्रगती विविध ठिकाणी भेट देऊन जाणून घेतली. कामाची वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी ही एकप्रकारची आकस्मिक भेट होती. दिनांक ३१ मे पर्यंत ही नालेस्वच्छता पूर्ण व्हावी, जेणेकरुन पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (Mangalprabhat Lodha Inspection)