मुंबई : (Suvendu Adhikari Bengal CM) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालच्या पुढील मुख्यमंत्रीपदाच्या नावावरील पडदा हटवला. त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करत, पश्चिम बंगालचे पुढील मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारीच असतील, असे स्पष्ट केले. यासंदर्भात झालेल्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपच्या पश्चिम बंगाल विधानसभा सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. सर्व प्रस्ताव आणि समर्थन एकाच नावासाठी आले असून दुसरे कोणतेही नाव समोर आले नाही. त्यामुळे सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधायक दलाच्या नेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे अमित शाह यांनी जाहीर केले.(Suvendu Adhikari Bengal CM)
दशकानुदशके डाव्या विचारसरणीच्या पक्षांनंतर आणि तृणमूल काँग्रेसच्या ‘माँ-माटी-मानुष’ या घोषणांदरम्यान स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अखेर पश्चिम बंगालचा किल्ला जिंकला आहे. प्रचंड बहुमतासह मिळालेल्या या ऐतिहासिक विजयानंतर सरकार स्थापनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्याची धुरा आता ‘भूमिपुत्र’ म्हणून ओळखले जाणारे भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडे जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.(Suvendu Adhikari Bengal CM)
निवडणुकीनंतर राज्यातील अनेक भागांत हिंसक संघर्षाच्या घटना समोर आल्या. मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी असलेल्या सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय साहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे वातावरण अधिकच तापले. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे सर्वात प्रमुख दावेदार मानले जात होते. भाजप विधायक दलाची बैठक शुक्रवारी कोलकात्यात पार पडली. या महत्त्वाच्या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी अध्यक्षस्थानी होते. निवडणुकीतील विजयानंतर अमित शाह यांचा हा पहिलाच बंगाल दौरा होता.(Suvendu Adhikari Bengal CM)
भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भारत सेवाश्रम संघाशी संबंधित संत उत्पल महाराज, माजी आयपीएस अधिकारी राजेश कुमार आणि माजी एनएसजी कमांडो दिपांजन चक्रवर्ती यांच्याही नावांची मंत्रीपदासाठी चर्चा सुरू आहे. माणिकतला मतदारसंघाचे आमदार तपस रॉय यांना विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.(Suvendu Adhikari Bengal CM)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक