डोनाल्ड ट्रम्प यांच चुकलं, त्यांनी उद्धव ठाकरेंच ‘भोपळ्या’बद्दल अभिनंदन करायला हवं होत – नवनाथ बन
08-May-2026
Total Views |
मुंबई : (Navnath Ban) “डोनाल्ड ट्रम्प यांच चुकल, त्यांनी उद्धव ठाकरेंच ‘भोपळ्या’बद्दल अभिनंदन करायला हव होत. ट्रम्प यांनी मोदीजींच नाही तर महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ‘भोपळा’ मिळाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच अभिनंदन करायला हवं होत.देशाच नेतृत्व करण्यासाठी नरेंद्र मोदी सक्षम असून संजय राऊतांनी आधी आपल्या पक्षाची अवस्था बघावी,” असे प्रतिपादन भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.८ रोजी केले.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्यानंतर त्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या संजय राऊतांना लक्ष्य करताना ते बोलत होते.
तामिळनाडूमध्ये शपथविधीसाठी कोणाला बोलवायचं याचा अधिकार राज्यपालांना आहे.महाराष्ट्रात जनतेने घरी बसवल्यानंतर आता तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपद मिळावं अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा दिसते.राऊतांनी उद्धव ठाकरे यांच नाव घेऊन राजभवनात जावं, कदाचित सहानुभूतीने विचार होईल,” असा उपरोधिक सल्लाही बन यांनी दिला. (Navnath Ban)
"सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमत सिद्ध करण महत्त्वाच आहे.जो बहुमत सिद्ध करेल त्यालाच राज्यपाल बोलावतील.त्रीशंकू परिस्थिती निर्माण झाली की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडू लागतात."असेही बन म्हणाले.
भारतीय लोकशाही शेवटचा श्वास घेत आहे या संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की,“लोकशाही मजबूत आहे, पण उबाठा गट शेवटचा श्वास घेत आहे.जनतेनेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नाकारल्याचा हा परीणाम आहे.भाजप जिंकली की लोकशाही धोक्यात म्हणायचं आणि काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय म्हणायचं, हा ढोंगीपणा आहे.”
टीव्हीके पक्षावर टीका करणाऱ्या संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी उबाठा गटावर निशाणा साधला. “महाराष्ट्रात उबाठा गट पाला-पाचोळ्यासारखा उडून गेला. थलपती विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत १०८ जागा मिळवल्या, पण उद्धव ठाकरे यांना कधीच तीन अंकी आकडा गाठता आला नाही,” असा टोला बन यांनी लगावला. (Navnath Ban)
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली,“वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी आयुष्य घालवलं, पण आज उबाठा गट औरंगजेब आणि अफजल खानाचा गौरव करतो आहे.बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत.भाजपसोबत असताना सन्मान असलेल्या उबाठा गटाची अवस्था काँग्रेससोबत गेल्यानंतर बिकट झाली आहे."
जय पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन यांनी सांगितलं की, "प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असतं. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी संख्याबळ आणि बहुमत महत्त्वाचं असतं.२०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील." (Navnath Ban)