सातबारा उतारा बंद; गावठाणांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड महसुलमंत्र्यांचा निर्णय

    07-May-2026   
Total Views |
Property Card Maharashtra
 
मुंबई : (Property Card Maharashtra) राज्यातील ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये हद्दवाढीमुळे नवीन गावांचा समावेश झाला आहे, अशा भागातील जमिनींचे ७/१२ (सातबारा) उतारे आता बंद करण्यात येणार असून या क्षेत्रातील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचे 'प्रॉपर्टी कार्ड' म्हणजेच मालमत्ता पत्रक तयार करून देण्याचे निर्देश महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे शहरी भागात समाविष्ट झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
महसुलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक पार पडली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून आदेश काढण्यात येणार आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "जेव्हा एखादे गाव किंवा ग्रामीण भाग महापालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत येते, तेव्हा त्या जागेचे स्वरूप शेतीकडून अकृषक किंवा नागरी वस्तीकडे वळते. अशावेळी सातबारा उतारा बंद करून त्याऐवजी 'प्रॉपर्टी कार्ड' असणे कायदेशीरदृष्ट्या अधिक सुलभ असते."(Property Card Maharashtra)
 
हेही वाचा :  'भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचारावर खपवून घेणार नाही' महसूलमंत्र्यांचा सज्जड दम; एसओपी तयार करण्याचे आदेश
 
फायदे कोणते?
 
मालमत्तेचे हस्तांतरण करणे सोपे होईल.
बँकांकडून कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर होतील.
जमिनीच्या नोंदींमध्ये सुसूत्रता येईल.(Property Card Maharashtra)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....