मुंबई : (Hindu Sammelan) बोरिवली परिसरातील गोराईनगर व भीमनगर वस्तीच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने नुकतेच गोराईचा राजा गणेश मंदिराजवळील मैदानात भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक संस्कार, सामाजिक जागृती आणि हिंदू एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेदाचार्य वैद्य स्वप्निल चितळे, गोरेगाव विभाग व्यवस्था प्रमुख रोहित देशपांडे तसेच श्रीमती प्रीती राऊत उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सांघिक गीत सादर करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि बोरिवली भागातील जनप्रतिनिधी यांचे सकल हिंदू समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात भीमनगर वस्तीतील मुलांनी गणेश अथर्वशीर्ष, गणेश वंदना, हनुमान चालीसा, मानवी मनोरे आणि नृत्याचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रणयनगर येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे नाटक सादर केले, तर भीमनगरमधील मुलांनी देशभक्तिपर व संस्कार प्रधान गीते सादर केली.(Hindu Sammelan)
वैद्य स्वप्निल चितळे यांनी आपल्या मार्गदर्शनात हिंदुत्व आणि आयुर्वेद यांचा परस्परसंबंध तसेच भारतीय संस्कृतीतील आयुर्वेदाचे महत्त्व उलगडून सांगितले. रोहित देशपांडे यांनी पंचपरिवर्तन काळाची गरज अधोरेखित करत समाजामध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक जागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तर श्रीमती प्रीती राऊत यांनी हिंदू महिलांनी लव्ह जिहादसारख्या घटनांपासून सावध राहावे, असे आवाहन केले. महिलांनी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षित होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.(Hindu Sammelan)
संमेलनादरम्यान परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवक, जनप्रतिनिधी, महिला, युवक आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. उपस्थितांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा आनंद घेत मुलांचे आणि शिक्षकांचे विशेष कौतुक केले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी भीमनगर वस्तीतील स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.(Hindu Sammelan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक