मुंबईत वादळीवारा! एकनाथ शिंदेंच्या हॅलिकॉप्टरला फटका! पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे अपघात टळला

    07-May-2026
Total Views |

Eknath Shinde
 
मुंबई : (Eknath Shinde's Helicopter Landing) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला असून , कल्याण मध्ये अचानक आलेल्या वादळात हे हेलिकॉप्टर अडकले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व जण सुखरूप बचावले. महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाड येथे एका लग्न सोहळ्यासाठी गुरुवार दि. ७ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जात होते. त्यावेळी अचानक आलेल्या वादळामध्ये हेलिकॉप्टर अडकले पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे नंतर स्थिती नियंत्रणात आली.आणि जुहू विमानतळ येथे तातडीने लँडिंग करण्यात आले.

 
हेही वाचा :  मुंबई वॉटर मेट्रोमुळे देशात जलवाहतुकीचा नवा अध्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
 
"या घटनेआधी अर्धा तास मी त्यांच्यासोबत होतो.मुरबाडला जात असताना ठाण्याजवळ चक्री वादळास सुरुवात झाली.पण सुदैवाने पायलटच्या सावधतेमुळे आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रसंग टळला.मी देवाचे आभार मानतो." अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना दिली आहे.(Eknath Shinde's Helicopter Landing)