मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती करण्यास भर द्या- अश्विनी भिडे यांचे निर्देश

    07-May-2026
Total Views |
Digital Census Registration
 
मुंबई: (Digital Census Registration) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 'जनगणना - २०२७' अंतर्गत स्व-गणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया प्रभावीपणे राबवावी, त्यादृष्टीने आवश्यक जनजागृती करावी. महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी स्व-गणना प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून काम करावे. तसेच, मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, बस स्थानक, मेट्रो, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी स्व-गणेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.
 
जनगणना - २०२७ अंतर्गत स्व- गणनेसंदर्भात महानगरपालिका मुख्यालयात आज आढावा बैठक पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सर्व परिमंडळांचे उपायुक्त आणि सहायक आयुक्त, सहसंचालक (जनगणना) संतोष पायस, कार्यकारी आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. संतोष गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.(Digital Census Registration)
 
जनगणना २०२७ च्या कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी संख्या आणि प्रशिक्षणाच्या कामकाजाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत मुंबई शहर अंतर्गत २४ हजार २८५ आणि उपनगरात ४६ हजार ३७२ नागरिकांनी जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणनेच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. पालिका क्षेत्रामध्ये जनगणना - २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत दिनांक १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणना पार पडणार आहे. यानंतर घरयादी व घरगणनेची सुरूवात दिनांक १६ मे ते दिनांक १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे.(Digital Census Registration)
 
 
महानगरपालिकेच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेचे सदिच्छादूत (ॲम्बेसेडर) म्हणून जबाबदारी स्वीकारावी. महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्र (CFC), विविध आस्थापना कार्यालये, प्रशासकीय विभाग कार्यालये याठिकाणी स्व-गणनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. व्यापक जनजागृती माध्यमातून स्व-गणनेच्या प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले.(Digital Census Registration)
 
स्व-गणनेची माहिती डिजिटल स्वरूपात भरण्यासाठी स्व-गणनेसंदर्भातील संकेतस्थळाची लिंक अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी गरज आहे. ही लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ठिकाणीही जनजागृतीसाठी अधिकाधिक प्राधान्य देण्यात यावे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आरोग्य सेविकांच्या मदतीने स्वगणनेची लिंक अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही आयुक्त यांनी दिल्या.(Digital Census Registration)
 
उपायुक्त तसेच प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त यांनी अधिकाधिक कर्मचारी स्वगणनेच्या प्रक्रियेत सहभागी होतील, यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.(Digital Census Registration)