मुंबई : (Chandrashekhar Bawankule) राज्यातील भूसंपादन प्रक्रियेत कोणत्याही स्वरूपात गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या घामाचा मोबदला हडपणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची आणि भू-माफियांची आता खैर नाही," अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला सज्जड दम भरला.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनामध्ये अधिकारी पैसे मागत असल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त होताच, महसूलमंत्र्यांनी तातडीची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "प्रकल्प जाहीर होण्यापूर्वी दोन ते तीन वर्षे आधी ज्या जमिनींची खरेदी-विक्री झाली आहे, त्यांची सखोल चौकशी करा. जमिनीचा मोबदला लाटण्यासाठी संगनमताने व्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. जास्त भावाने जमिनी खरेदी केल्याचे दाखवून झालेल्या रजिस्ट्रींची चौकशी करून सत्य बाहेर आणा." (Chandrashekhar Bawankule)
तसेच त्यांनी ठाण्यातील भूदान जमिनींच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. भूदान जमिनी 'वर्ग-१' करून त्या रहिवासी क्षेत्रात कशा वळवण्यात आल्या, याची आता झाडाझडती होणार आहे. जे अधिकारी मोबदला देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत आहेत, त्यांच्यावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.(Chandrashekhar Bawankule)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....