पाटणा : (Bihar Cabinet Expansion) पाटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानात मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. जिथे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नितिश कुमार, विजय सिन्हा, श्रवण कुमार आणि लेसी सिंह यांच्यासारख्या एकूण ३२ मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही उपस्थिती लावली होती.
सुत्रांच्या मते, भाजपच्या आणि जनता दल युनायटेडच्या १६-१६ मंत्र्यांचा हा शपथविधी पार पडला. एनडीए सरकारमध्ये सामाविष्ट असलेल्या भाजप, जेडीयू, एलजेपी (आर) आणि एचएएम कोट्यातील एकूण ३२ जणांचा शपथविधी पार पडला आहे. बिहारच्या एनडीए सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तारात संघटनात्मक मजबूतीवर विशेष भर देण्यात आल्याची चर्चा आहे.(Bihar Cabinet Expansion)
भगवान सिंह कुशवाहा, अरुण शंकर प्रसाद, मदन सहनी, डॉ.संतोष कुमार सुमन, रमा निषाद, रत्नेश सहा, कुमार शैलेंद्र, शीला कुमारी, केदार प्रसाद गुप्ता, लखेंद्र कुमार रौशन यांनी बिहारच्या मंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे माजी मुख्यमंत्री निशांत कुमार यांनी बिहार सरकारच्या मंत्रीमंडळात शपथ घेतली आहे.(Bihar Cabinet Expansion)
भाजपचे मंत्री
1. राम कृपाल यादव
2. केदार गुप्ता
3. नीतीश मिश्रा
4. मिथलेश तिवारी
5. रमा निषाद
6. विजय कुमार सिन्हा
7. दिलीप जायसवाल
8. प्रमोद चंद्रवंशी
9. लखविंदर पासवान
10. संजय टाइगर
11. इंजीनियर कुमार शैलेन्द्र
12. नंद किशोर राम
13. रामचंद्र प्रसाद
14. अरुण शंकर प्रसाद
जदयूचे मंत्री
1. निशांत कुमार
2. श्रवण कुमार
3. मदन सहनी
4. लेसी सिंह
5. श्वेता गुप्ता
6. भगवान सिंह कुशवाहा
7. दामोदर रावत
8. बुलो मंडल
9. सुनील कुमार
10. शीला मंडल
11. रत्नेश सदा
12. जमा खान
13. अशोक चौधरी
14. LJP(RV) के मंत्री
15. संजय पासवान
16. संजय सिंह
एचएएमचे मंत्री
संतोष सुमन
आरएलएमचे मंत्री
दीपक प्रकाश