भांडुप टेकडी जलाशय BHR येथील डोंगर भागात गांजाची बेकायदेशीर लागवड उध्वस्त

    07-May-2026
Total Views |
Bhandup Hill Reservoir
 
मुंबई : (Bhandup Hill Reservoir) भांडुप टेकडी जलाशय (BHR) येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची शेती केल्याची माहिती स्थानिक भाजपा नगरसेविका जागृती पाटील यांना मिळाली.
 
माहिती मिळताच नगरसेविका जागृती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्वरित भांडुप पोलीस ठाण्यास कळवले. भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व डोंगर भागात लागवड केलेली गांजाची झाडे पूर्णपणे नष्ट केली. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.(Bhandup Hill Reservoir)
 
हेही वाचा :  गोराईनगर-भीमनगर वस्तीतील हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
 
नगरसेविका जागृती पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अशा प्रकारची कोणतीही बेकायदेशीर कृत्ये निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा.(Bhandup Hill Reservoir)
 
संपर्क:कार्यालय, नगरसेविका जागृती पाटील
मो. 9930145502 / 9833166797