अखेर! ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त, राज्यपालांनी वापरला ‘तो’ अधिकार

    07-May-2026
Total Views |
MAMTA BANERJEE
 
कोलकाता : (Article 174 of the Indian Constitution) पश्चिम बंगालमध्ये सरकार कोसळल्यानंतरही खुर्चीला चिकटून बसणाऱ्या ममता बॅनर्जींना राज्यपालांनी घटनात्मक अधिकार वापरत चांगलाच दणका दिला आहे. नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वी त्यांनी संपूर्ण ममता मंत्रिमंडळच बरखास्त करून टाकले. सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
 
आता राज्यपाल आर.एन.रवी यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम १७४ मधील उपकलम (२) च्या खंड (ब) अंतर्गत राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पश्चिम बंगाल विधानसभेचे विसर्जन करण्याचा आदेश जारी केला. तसेच हा आदेश भारतीय राज्यघटनेच्या कलम १७४(२)(ब) अंतर्गत असलेल्या घटनात्मक तरतुदीनुसार तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असल्याची माहिती पश्चिम बंगाल लोकभवानाद्वारे देण्यात आली आहे.
 
हेही वाचा :  पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचा पराभव अन् आता संजय राऊतांना जनतेमध्ये फिरण्याची आठवण — नवनाथ बन
 
१५ वर्षे मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जींना खुर्चीचा मोह सोडवेनासा झाला होता. त्यांना सन्मानपूर्वक पायउतार होऊन पदाची आणि आपल्या पक्षाची गरीमा राखता आली असती. मात्र, ममतांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे आता त्यांचे संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त झाले.(Article 174 of the Indian Constitution)
 
अमित शाह प.बंगालमध्ये दाखल
 
बिहार सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार शपथविधी पूर्ण झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची नियुक्ती पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेसाठी पर्यावेक्षक म्हणून झाली आहे. भाजपच्या पहिल्या शपथविध सरकारचा सोहळा कोलकाता येथील बिग्रेड परेड ग्राऊंडवर केला जाणार आहे. शपथविधीसाठी सुमारे ४००० पोलीस तैनात आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि भाजपचे अन्य राज्यातील मुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Article 174 of the Indian Constitution)