मुंबई : (Sunetra Pawar Resignation) उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या बारामती विधानसभा निवडणूकीत सुनेत्रा पवार यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांना तब्बल २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली. नियमानुसार, कोणत्याही लोकप्रतिनिधीने एकाच वेळी दोन्ही सभागृहांत राहू नये. त्यानुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या जागी कुणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Sunetra Pawar Resignation)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....