Pune Child Abuse Case : पुण्यात सख्ख्या आजोबाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न! काय घडलं?

    06-May-2026
Total Views |

Pune Child Abuse Case

 
मुंबई : (Pune Child Abuse Case) नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील पर्वती येथे सख्ख्या आजोबानेच आपल्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.(Pune Child Abuse Case)




मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मजुरी करत असल्याने त्यांनी आपल्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या ७० वर्षीय आजोबाकडे ठेवले होते. दरम्यान, या नराधम आजोबाकडे नातू आणि नात दोघेही आले होते. आरोपीने नातवाला पैसे देऊन खाऊ घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीच्या अंगावरचे कपडे काढले आणि स्वत:चे कपडेदेखील काढण्याच्या तयारीत होता. आरोपी पत्र्याच्या घरात राहिला असल्याने एका महिलेचे लक्ष गेले आणि हा सगळा प्रकार पुढे आला.(Pune Child Abuse Case)

 


 

नागरिकांनी त्या मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. अंबादास जाधव असे आरोपीचे नाव असून तो ७० वर्षांचा आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि नागरिकांनी आरोपीला पकडून ठेवले. घटनास्थळी पोलिस दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली. दरम्यान, या आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.(Pune Child Abuse Case)