मशाल विझवण्याची सुपारी राऊतांनी घेतली; उबाठाचा शेवटचा दिवा तेच विझवणार - नवनाथ बन

    06-May-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवार दि.६ रोजीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले की, "भाजपच्या विजयावर बोलताना राऊत म्हणाले होते की “दिवा विझताना मोठा होतो”, मात्र प्रत्यक्षात राऊतच शेवटचे फडफडणारे दिवे आहेत. मशाल विझवण्याची सुपारी त्यांनीच घेतली असून उबाठाचा शेवटचा दिवा विझवण्याचे काम ते करत आहेत. भाजप हा सूर्य असून जनतेचे आशीर्वाद आणि सेवा जोपर्यंत सोबत आहे, तोपर्यंत भाजपचा पराभव होणार नाही."(Navnath Ban)
 
ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "एखाद्याला नोकरीवरून काढल्यानंतर दिलेला राजीनामा निरर्थक असतो. ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला किंवा नाही दिला तरी त्याने काहीही फरक पडत नाही. बंगालमध्ये जनमताचा सन्मान करण्याऐवजी दादागिरीचे राजकारण करण्यात आले आणि त्याचेच समर्थन संजय राऊत करत आहेत."(Navnath Ban)
 
संजय राऊत यांच्या विधानांवर टीका करताना नवनाथ बन म्हणाले की," त्यांनी थेट इराण-इस्त्रायल संघर्षाशी तुलना केली, नशीब त्यांनी जागतिक महायुद्ध किंवा जपानवरील अणुबॉम्बशी तुलना केली नाही. भाजप ही जनतेच्या विश्वासावर निवडून येणारी पार्टी असून घरात बसून राजकारण करण्याची भाजपची परंपरा नाही."(Navnath Ban)
 
हेही वाचा : Vijay Thalapathy : सत्तेच्या उंबरठ्यावर विजय! मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जवळपास निश्चित; त्रिशाचा जुना व्हिडिओ पुन्हा ट्रेंडिंग... 
 
उद्धव ठाकरे यांच्यावर उपरोधिक टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, "त्यांनी मातोश्री सोडून ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर किंवा घरात बसून वर्षभर आंदोलन करावे. त्यामुळे त्यांच्या राजकारणाचे वास्तव जनतेसमोर येईल."(Navnath Ban)
 
सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या पक्षातील आमदार आणि खासदार सांभाळावेत, असा सल्ला नवनाथ बन यांनी दिला. संजय दीना पाटील यांच्या घरातील व्यक्ती रुग्णालयात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती, मात्र राऊतांना स्वतःच्या पक्षातील घडामोडींचीच माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला.(Navnath Ban)
 
जालना प्रकरणावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की," जबरदस्तीने धर्मांतरण करणे चुकीचे असून सरकार याची गंभीर दखल घेत आहे. या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई केली जाईल."(Navnath Ban)
 
पुण्यातील अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नवनाथ बन म्हणाले की," स्वतःच्या नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाने माणुसकीलाच काळीमा फासला आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात घेण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत."(Navnath Ban)