एस आय आर मुळे राज्यातील घुसखोर हद्दपार होणार - किरीट सोमय्या

प्रदेश भाजपची एस.आय. आर.संदर्भात कार्यशाळा संपन्न

    06-May-2026
Total Views |
 Kirit Somaiya
 
मुंबई : ( Kirit Somaiya) "महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या एस आय आर संदर्भात आज भाजपची कार्यशाळा संपन्न झाली. राज्यात जवळपास ५० लाख बोगस मतदार आहेत.यावर भाजपचे कार्यकर्ते आक्षेप घेणार आहेत. कारण त्यांच्याकडे बोगस जन्मप्रमाणपत्रे पुरावे आहेत.एस.आय.आर.मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील असे बोगस बांगलादेशी खुसखोर हद्दपार होणार असून बोगस मतदानास पूर्णविराम मिळणार आहे."
 
असे प्रतिपादन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवार दि.६ रोजी केले. ( Kirit Somaiya)
 
मतदार यादीमध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर, मुंबई येथील वसंत स्मृती कार्यालयात बुधवार दि.६ रोजी प्रदेश कार्यशाळा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
 
"आगामी काळात बुथ स्तरावर ही प्रक्रिया अधिक गतिमान आणि प्रभावीपणे कशी राबवता येईल, याविषयी कार्यशाळेत विस्तृत चर्चा झाली." अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. ( Kirit Somaiya)
 
तर भाजप आमदार संजय उपाध्याय म्हणाले की," एस. आय. आर. मोहिम होत असताना पक्ष म्हणून आपण काय दक्षता घेतली पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.नवीन मतदार यादीतून बोगस नावे, बांगलादेशी रोहिंग्या ही नावे वगळण्यात येतील.पूर्वी विरोधकांना फेक नेरेटीवसाठी इ. व्हि. एम .मुद्दा होता आता एस.आय. आर. मुद्दा मिळाला आहे."
 
भाजप सरचिटणीस राजेश शिरवडकर म्हणाले की,"एखादा राज्यातील व्यक्ती दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा दोन्हीकडे त्याची दुबार मतदार म्हणून नावे असतात. ती एस आय आर द्वारे वगळण्यात आली.आजच्या बैठकीत राष्ट्रीय महामंत्री शिवप्रकाश यांनी चांगले मार्गदर्शन केले. प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पित भावनेने राष्ट्रासाठी हे कार्य करायचे आहे." ( Kirit Somaiya)
 
या कार्यशाळेस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे आणि माजी खासदार किरीट सोमय्या, मुंबई भाजप उपाध्यक्ष व दैनिक मुंबई तरुण भारत संपादक किरण शेलार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Kirit Somaiya)