Dadar Vasant Smriti Baithak : ‘वसंत स्मृती’, दादर येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
06-May-2026
Total Views |
मुंबई : (Dadar Vasant Smriti Baithak) मंगळवार दि.५ रोजी वसंत स्मृती’, दादर येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
"या बैठकीत पक्षाची आगामी धोरणे, मुंबईतील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि मुंबईकरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजप मुंबई सज्ज आहे."अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार अमित साटम यांनी एक्स हँडलवरून याबाबत दिली.(Dadar Vasant Smriti Baithak)
याप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार , कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर , भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा आ. चित्रा वाघ, आ. अतुल भातखळकर, आ. कॅप्टन तमिळ सेल्वन , आ. प्रसाद लाड ,आ. मनीषाताई चौधरी, आ. विद्या ठाकूर , आ. पराग शाह ,आ. संजय उपाध्याय , आ. मिहीर कोटेचा तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे , मुंबई महानगरपालिका सभागृह नेते गणेश खणकर उपस्थित होते.(Dadar Vasant Smriti Baithak)