मुंबई : (Panvel Aquarium Project) पनवेलसारख्या भौगोलिक महत्त्व असलेल्या व झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात एखादा मोठा पर्यटन दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असणे आवश्यक आहे या दूरदृष्टीने आमदार विक्रांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2026 मागणी केली होती. याविषयावर मंत्री नितेश राणे यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. 5 रोजी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.(Panvel Aquarium Project)
या बैठकी दरम्यान आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेलचे भौगोलिक महत्त्व व या आंतराष्ट्रीय दर्जाच्या अॅक्वेरियमची आवश्यकता हे विषय विस्तृतपणे माहिती देऊन पटवून दिले. विशेषतः जवळच साकारलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नव्याने होत असलेली तिसरी मुंबई तसेच नैना प्रकल्प यामुळे यासंपूर्ण भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे असा अॅक्वेरियमचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाला चालना देणारा ठरेल. तसेच या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचा अभ्यास, शैक्षणिक संशोधन आणि स्थानिक रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल, याचे महत्व आमदार विक्रांत पाटील यांनी पटवून दिले.(Panvel Aquarium Project)
या बैठकीस आयुक्त मत्स्यविभाग प्रेरणा देशभ्रतार, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, कोंकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी, इतर तज्ज्ञ आणि जिल्हाधिकारी कार्यालय रायगडचे अधिकारी उपस्थित होते.(Panvel Aquarium Project)
या प्रकल्पासाठी लागणारी जागा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून पनवेल येथील मत्स्य उपकेंद्राच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असून हि जागा गोडे पाणी व खारे पाणी याची उपलब्धता असणारी आहे. तसेच प्रकल्पाच्या पुढील विकासासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभाग पुढील आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी माहिती विक्रांत पाटील यांनी दिली.(Panvel Aquarium Project)
या प्रकल्पामध्ये सागरी तसेच गोड्या पाण्यातील विविध जीवसृष्टीचे प्रदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अॅक्वेरियम, तसेच पर्यटकांना आकर्षित करणारे “सी लायन शो” यांसारख्या उपक्रमांचा समावेश असणार आहे. हा प्रकल्प आंतराष्ट्रीय दर्जाचा असणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे सल्लागार नियुक्त केले जातील असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले.(Panvel Aquarium Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.