West Bengal Politics : ममता दिदी! हिंदूंना एका सेकंदात संपविण्याची दिलेली धमकी विसरलात तर नाही ना?

    04-May-2026
Total Views |
West Bengal Political Controversy
 
मुंबई : (West Bengal Politics) बांगलादेशींना अभय दिलं, हिंदूंची घरे जाळली, महिलांची अब्रू लुटली ममतांच्या तुघलकी सरकारच्या पापाचा घडा अखेर भरलाच!
 
“मी मुख्यमंत्री आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. जर तुम्ही मला हटवून भाजपला मतदान केले तर एक समुदाय आहे जो तुम्हाला एका सेकंदात संपवेल.”, हे वाक्य आहे हिंदूंना उघड धमक्या देणाऱ्या ममता बॅनर्जी यांचं. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसून अशाप्रकारे हिंदूंना धमकी देण्याचे काय परिणाम होऊ शकतात हे ममता दिदींनी आज स्वतः अनुभवलं आहे. ४ मे नंतर निवडणुकांसाठी तैनात करण्यात आलेले केंद्रीय सुरक्षा दल परत जाईल, मात्र राज्यातील पोलिसांना बंगालमध्येच राहावे लागेल. आम्हाला सर्व अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबांची माहिती आहे. निवडणुकांनंतर त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी उघड धमकी देणाऱ्या ममता दिदींवर ही वेळ का आली? (West Bengal Politics)
 
पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता दिदींनी गेल्या काही दशकांपासून 'व्होट बँक' जपण्यासाठी केल्या गेलेल्या राजकारणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेला हा प्रांत आता वैचारिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या केंद्रस्थानी आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसवर सातत्याने होणारा 'हिंदूविरोधी' असल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेला जनक्षोभ हा अलीकडच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या यशाचा मुख्य आधार ठरला आहे. हिंदूविरोधी ममतांच्या सत्तेला जणू सुरुंग लागल्याचे चित्र याठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय.(West Bengal Politics)
 
पश्चिम बंगालच्या राजकारणात(West Bengal Politics) मोठे बदल दिसून येत असून भारतीय जनता पक्ष राज्यात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतेय. बंगालमध्ये सीमावर्ती भागांत वाढती घुसखोरी आणि लोकसंख्येच्या बदलत्या प्रमाणामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सामाजिक संतुलन बिघडले. जेव्हा जेव्हा कट्टरपंथीयांकडून हिंदूंवर हल्ले झाले, तेव्हा राज्य प्रशासनाने घेतलेली 'बचावात्मक' किंवा 'दुर्लक्षाची' भूमिका हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरली.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण हे अलीकडच्या काळातील सर्वात भयानक उदाहरण ठरले. संदेशखालीतील हिंदू महिलांनी तृणमूलच्या स्थानिक नेत्यांवर केलेले लैंगिक शोषणाचे आणि जमिनी बळकावल्याचे आरोप केवळ गुन्हेगारी नाही, तर ते एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारे वाटले. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर २४ परगणा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये घुसखोरांना ओळखपत्रे देऊन त्यांची व्होट बँक तयार करणे, हा हिंदूंच्या राजकीय अस्तित्वावर घाला म्हणावा.(West Bengal Politics)
 
२०११ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या प्रकारे भाजप समर्थकांना आणि विशेषतः हिंदू वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले, त्यावरून प्रशासकीय यंत्रणेच्या निपक्षपातीपणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हजारो लोकांना आपली घरे सोडून शेजारील राज्यांत आश्रय घ्यावा लागला होता. ममता सरकारच्या काळात दुर्गापूजा आणि विसर्जन मिरवणुकींवर केवळ 'नमाजाची वेळ' किंवा 'संवेदनशील भागा'च्या नावाखाली निर्बंध लादण्याचे प्रयत्न झाले. कलकत्ता उच्च न्यायालयानेही अनेकदा या संदर्भात सरकारला चपराक लगावली आहे.(West Bengal Politics)

West Bengal Political Controversy 
 
ममता बॅनर्जी यांनी इमाम भत्ता देणे किंवा विशिष्ट समुदायाला झुकते माप देणे यांसारख्या निर्णयांनी हिंदू मतदारांमध्ये आपण आपल्याच राज्यात 'द्वितीय श्रेणीचे नागरिक' होत असल्याची भावना प्रबळ केली. जय श्रीरामच्या घोषणांवर झालेली मुख्यमंत्री बॅनर्जी यांची चिडचिड ही त्यांच्या विरोधकांसाठी हिंदू अस्मितेचा मुद्दा बनली. या अनन्वित अत्याचारांविरुद्ध जेव्हा सामान्य हिंदू नागरिक संघटित झाला, तेव्हा त्याचे प्रतिबिंब मतपेटीतून उमटले. भाजपला मिळालेले यश हे केवळ राजकीय रणनीती नसून, तो बंगालच्या संस्कृतीला आणि धर्माला वाचवण्यासाठी हिंदू समाजाने दिलेला एक सामूहिक कौल आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.(West Bengal Politics)
 
२०१६-१७ मध्ये मोहरम आणि दुर्गापूजा विसर्जन एकाच दिवशी आले असताना, राज्य सरकारने विसर्जनावर घातलेली बंदी आणि त्यानंतर हायकोर्टाने ओढलेले ताशेरे हा मुद्दा ममतांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तकांतून 'रामधेनु' या शब्दाऐवजी 'रंगधेनु' असा शब्दप्रयोग वापरण्याचा झालेला प्रयत्न, हे हिंदू सांस्कृतिक खुणा पुसण्याचे षडयंत्र असल्याचे स्पष्ट होते.(West Bengal Politics)
 
 
पश्चिम बंगालमधील सत्तासंघर्ष आता केवळ सत्तेसाठी नसून तो अस्तित्वासाठीचा लढा बनलाय. तुष्टीकरणाचा अतिरेक आणि कट्टरपंथीयांना मिळणारे अभय यामुळे हिंदू जनमानस पेटून उठले आहे. संदेशखालीसारख्या घटनांनी या असंतोषाला वाचा फोडली असून, बंगालमध्ये आता 'ध्रुवीकरण' हा केवळ शब्द उरलेला नसून ती एक वास्तववादी राजकीय शक्ती झाली आहे.(West Bengal Politics)
 
पश्चिम बंगालची भूमी ही चैतन्य महाप्रभू आणि स्वामी विवेकानंदांची भूमी आहे. या भूमीवर जेव्हा बहुसंख्य समाज स्वतःला असुरक्षित समजतो, तेव्हा सत्तेचा 'सुरुंग' अटळ असतो. ममता बॅनर्जींचे राजकारण हे केवळ सत्तेसाठीचे 'तुष्टीकरण' नसून ते बंगालच्या मूळ हिंदू संस्कृतीला विस्थापित करणारे ठरत आहे. म्हणूनच, भाजपला मिळणारे यश हे केवळ राजकीय विजय नसून, तो बंगालच्या आत्मसन्मानाचा हुंकार आहे. काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करुन कळवा.(West Bengal Politics)