West Bengal Election Results LIVE : बंगालमध्ये ‘खेला’, निवडणूक कलांमध्ये १८७ जागांवर भाजपची आघाडी, ममतांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग
04-May-2026
Total Views |
कोलकाता (West Bengal Election Results 2026) : पश्चिम बंगालच्या एकूण २९४ जागांवरील २९३ जागांचे निकाल सोमवार, दि. ४ मे रोजी जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७७ मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षेत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. दुपारपर्यंत निकाल आणि सत्ता कुणाची याबद्दल स्पष्टता येण्याची चिन्हे आहेत.
#WATCH | West Bengal Elections 2026 | Kolkata: BJP workers distribute 'jhalmuri' and celebrate at the party office in Kolkata.
BJP has crossed the majority mark in the state; currently leading on 169 seats, as per the official EC trends. pic.twitter.com/i93T0tKUn1
सध्याच्या आकडेवारीतून भाजपच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तूर्तच्या आकडेवारीतून मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींनी भवानीपूर मतदार संघातून त्या पिछाडीवर दिसत आहेत. नंदीग्राममध्ये सुवेंद्रु अधिकारी सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. सुवेंद्रु अधिकारींनी दोन्ही जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.
#WATCH | Kolkata, West Bengal: Celebrations outside the BJP office in Kolkata as the party crosses the majority mark in the state.
काँग्रेसचे अधीर रंजन चौधरींनाही भाजपच्या त्सुनामीचा फटका बसला आहे. बहरामपूर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय मानले जाते. पश्चिम बंगालमधील हे सातवे मोठे शहर आहे. काँग्रेसच्या सत्तेचे प्रवेशद्वार, अशी या मतदार संघाची ओळख आहे. मात्र, काँग्रेसचे उमेदवार असलेले अधीर रंजन चौधरी या ठिकाणाहून पिछाडीवर आहेत. भाजपच्या सुब्रत मैत्रा यांनी या ठिकाणी आघाडी घेतली आहे. तृणमुलच्या गोपाल मुखर्जींचीही विजयाची वाट कठीण होऊन बसली आहे.
#WATCH | Kolkata, West Bengal: BJP candidate from Nandigram and Bhabanipur Assembly constituencies, Suvendu Adhikari, says, "The BJP will form the government with more than 180 seats." pic.twitter.com/1SpWYj1nQG
पश्चिम बंगालमध्ये सध्याचे चित्र पाहता भाजपला स्पष्ट बहुमत दिसत आहे. भाजप १९० जागांवर आघाडी घेत आहे. तर तृणमुल ९९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये खातेही उघडता आलेले दिसत नाही. ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला भेदत भाजपने एकूण ४५ टक्के मते मिळवली. तृणमुल काँग्रेसला ४२ टक्के मिळवता आली आहेत. कोलकाता भाजपच्या कार्यालयाबाहेर कमळाचे फूल घेऊन कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला.
सुवेंद्रु अधिकारींनी दिलेल्या प्रतिक्रियेत, भाजप १८०हून अधिक जागा मिळवत सरकार स्थापन करेल, असा दावा केला आहे. ममता बॅनर्जींनी हिंदूंवर केलेल्या अत्याचाराला निवडणूकीत मतांमधून वाचा फुटली, असा दावा त्यांनी केला आहे. आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई भाजपतर्फे ही निवडणूक लढवत आहे. भाजपने रत्ना देबनाथ यांना तिकीट देत त्यांना ममतांच्या जुलमी राजवटीविरोधात मैदानात उतरवले होते. सध्या त्या २७६३ इतक्या मतांची आघाडी घेताना दिसत आहेत.
BJP crosses the majority mark in West Bengal, leading on 148 seats currently. Counting is still underway. pic.twitter.com/4YJ0lFvuM2
राज्यात यावेळी दोन टप्प्यांत — 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडले. निवडणुकीतील मुख्य लढत तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या ममता बॅनर्जी, भारतीय जनता पार्टी (BJP) आणि काँग्रेस-डाव्या आघाडी यांच्यात पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत बंगालमध्ये विक्रमी मतदान नोंदवले गेले असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची धडधड वाढली आहे. दोन्ही टप्प्यांत 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले, जे बंगालच्या निवडणूक इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.