Tamil Nadu Election Results : विजयमुळेच स्टॅलिन यांचा ‘विजय’ हुकला!- माजी सहकारी व्ही. एस. बाबू ठरला ‘जायंट किलर’

- 8 हजार मतांनी कोथलूरमधून पराभवाचा धक्का

    04-May-2026
Total Views |
Tamilnadu Election

मुंबई: (Tamil Nadu Election Results) तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुकच्या सत्तेला सुरुंग लागला असून, खुद्द मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनाही पराभवाचा सामना करावा लागाला आहे. सनातन संस्कृतीला नावे ठेवणे द्रमुकला महागात पडले असून, मतदारांनी यामुळेच द्रमुककडे पाठ फिरवल्याचे म्हणता येते. यामध्ये द्रमुकचे सर्वेसर्वा असलेल्या एम. के. स्टॅलिन यांचा झालेला पराभव चर्चेचा विषय असून, स्टॅलिन यांचे माजी सहकारी व्ही. एस. बाबू यांनीच हा पराभव केला आहे. बाबू यांनी आजवर द्रमुककडून पुरासवलकम विधानसभेचे प्रतिनिधित्त्व केले होते. त्यांनी जवळपास दोन दशकाहून अधिक काळ तामिळनाडूचे राजकारणात पाहिले आहे.(Tamil Nadu Election Results)
 
आजपर्यंत द्रमुकबरोबरची बांधिलकी जपणार्‍या बाबू यांनी, यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकला रामराम करत, विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ अर्थात ‘टीव्हीके’ पक्षाला टाळी दिली. विजय यांनी बाबूंना स्टॅलिन विरोधात कोलाथूर मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर केली. हा मतदारसंघ स्टॅलिन यांचा गड मानला गेल्याने, विजय यांच्या या निर्णयाकडे त्यावेळी अपरिपक्व राजकारण म्हणूनच पाहिले गेले.(Tamil Nadu Election Results)
 
मात्र, प्रत्यक्षात बाबू यांनी स्टॅलिन यांचा 8 हजार 795 मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत कोथलूर मतदारसंघातून सहज विजय मिळवणार्‍या स्टॅलिन यांना, 74 हजार 202 मते मिळाली, तर बाबू यांना 82 हजार 997 मते मिळाली. त्यामुळेच द्रमुकशी काडीमोड घेत, ‘टीव्हीके’शी संसार थाटणारे व्ही. एस. बाबू तामिळनाडूच्या राजकारणातील ‘जायंट किलर’ ठरले आहेत. (Tamil Nadu Election Results)
 
उदयनिधी स्टॅलिन यांचा निसटता विजय...
 
द्रमुक पक्षाचे उमेदवार आणि एम के स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांचा मात्र या विधानसभा निवडणुकीत विजय झाला असून, चेपॉक तिरुवल्लेकिनी हा पारंपारिक मतदारसंघ त्यांनी राखला आहे. मात्र, हा विजय निससटता असून, अवघ्या 7 हजार 140 मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. 2021 मध्ये झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणूकीमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांचा 69 हजार 355 मतांनी विजय झाला होता. त्यावेळी त्यांना 93 हजार 285 मते पडली होती, यावेळी त्यांना अवघी 62 हजार 992 मते पडली आहेत. सनातन धर्माबाबतच्या घृणास्पद वक्तव्यांमुळे यावेळी बहुतांशी मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे.(Tamil Nadu Election Results)