Sunetra Pawar Lead Baramati : बारामती आणि राहुरीत कुणाची सरशी? आकडेवारी काय सांगते?

    04-May-2026
Total Views |
Sunetra Pawar
 
मुंबई : (Sunetra Pawar Lead Baramati) बारामती आणि राहुरी पोटनिवडणूकीसाठी मतमोजणी सुरु असून आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार तर, राहुरीतून भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत.
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची तर, माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या निवडणूकीत बारामती विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध काही अपक्ष उमेदवार रिंगणात होते. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, सुनेत्रा पवार या १ लाख ७९ हजार ६२० मतांनी आघाडीवर आहेत. या आकड्यांमुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. सुनेत्रा पवार यांना मिळालेली मते पाहता त्यांनी अजित पवारांचा सर्वाधिक मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला असल्याचे बोलले जात आहे.(Sunetra Pawar Lead Baramati)
 
हेही वाचा :  काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील परिस्थिती नाजूक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
दुसरीकडे, राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले आणि शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात लढत झाली. यात अक्षय कर्डिले १ लाख ९७ हजार ७१२ मतांनी आघाडीवर आहेत. तर, गोविंद मोकाटे हे २३ हजार ४५९ मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे राहुरीत अक्षय कर्डिले यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.(Sunetra Pawar Lead Baramati)