Navnath Ban Statement : पाचपैकी तीन राज्यांत भाजप-एनडीएला स्पष्ट बहुमत - नवनाथ बन

    04-May-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban Statement) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी सोमवार दि.४ रोजी सांगितले की, "पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालात तीन ठिकाणी भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. आसाममध्ये हिमंत बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दमदार विजय मिळाला आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ चाललेली ममता बॅनर्जी यांची सत्ता संपुष्टात येत असून भाजपला बहुमत मिळत आहे. देश पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे." (Navnath Ban Statement)
 
"केरळमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यावर संजय राऊत कोणतीही शंका उपस्थित करत नाहीत, मात्र भाजप जिंकली की लगेच निवडणूक आयोगावर आरोप करतात. मतदार यादी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमुळे बंगालमध्ये बदल झाला असून बोगस मतदार आणि घुसखोर हटवल्यानंतर खरी जनमताची ताकद दिसून आली.एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे निकष लावणे हा दुटप्पीपणा असून राऊत यांनी हा “धंदा बंद करावा” (Navnath Ban Statement)
 
 
"निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाचा मित्र नसतो, तो पूर्णपणे निष्पक्षपणे काम करतो. पश्चिम बंगालमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे स्वतः राहुल गांधी यांनीही सांगितले होते.अशा परिस्थितीत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जींसाठी प्रचार का केला नाही? ते प्रचाराला गेले असते तर भाजपला अजून जास्त जागा मिळाल्या असत्या." असा टोला बन यांनी लगावला. (Navnath Ban Statement)
 
"पश्चिम बंगालमध्ये गेल्या १५ वर्षांपासून असलेली ममता बॅनर्जींची सत्ता संपवण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही मैदानात उतरून प्रचार केला. “आप लढो, हम कपडे संभालते हैं” हे धोरण भाजपचे नसून आम्ही कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून लढतो.आता बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन करून जनतेची सेवा करणार."असा विश्वास बन यांनी व्यक्त केला. (Navnath Ban Statement)
 
"नसरापूर प्रकरण अत्यंत गंभीर असून आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवले जाईल आणि पुढील काही महिन्यांत निकाल लागेल. एका चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या प्रकरणात राजकारण करणे अयोग्य आहे. संवेदनशील मुद्द्यांवर राजकारण टाळावे आणि न्याय प्रक्रियेला साथ द्यावी." असे बन यांनी आवाहन केले. (Navnath Ban Statement)