Marichjhapi Incident : बंगाल विसरला नाही! मारीचझापी हत्याकांड... अखेर बंगाली हिंदूंनी उलथवला देशविघातकी डाव्यांचा गड

    04-May-2026
Total Views |
WEST BEGAL
 
मुंबई : (Marichjhapi Incident) पश्चिम बंगालच्या निवडणूकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाने केवळ सत्तांतरच नव्हे तर परिवर्तन सुद्धा घडवून आणल्याचे दिसून येत आहे. एके काळी डाव्यांचं, तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या भागात, लोकशाहीच्या मार्गाने परिवर्तनाची पहाट उगवली. मागच्या काही काळात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात हौदोस माजवण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरलं होतं. निवडणूकीच्या निकालादरम्यान सुद्धा असाच काहीसा प्रचार तिथे आपल्याला बघायाला मिळतो आहे. पश्चिम बंगालचा विजय हा खऱ्या अर्थाने तिथल्या हिंदूंचा विजय असल्याचं बोललं जात आहे. सत्तेसाठी विशिष्ठ समाजघटकांचं लांगुलचालन करणाऱ्या लोकांसाठी हा निकाल म्हणजे चपराकच आहे. येणाऱ्या काळात सत्तास्थानी विराजमान होणाऱ्या नेतृत्वाकडून जनतेच्या अपेक्षा असणार आहेत. कारण एके काळी याच भूमीमध्ये (Marichjhapi Incident) हजारो निष्पाप हिंदूंची, वनवासी लोकांची हत्या घडवून आणण्यात आली होती. 
निर्वासितांच्या छावणीमध्ये १९७९ साली काय घडलं? इतिहासातील काळा अध्याय जाणून घेऊया.(Marichjhapi Incident)
 
  
हिंदुस्थानाच्या इतिहासाला आकार देणारी भूमी म्हणजे बंगभूमी. गुलामीच्या कचाट्यात अडकलेल्या देशाला स्वातंत्र्याचा आणि प्रबोधनाचा विचार देणारी माणसं पश्चिम बंगालच्या मातीमध्ये जन्माला आली आणि राष्ट्राचा इतिहास बदलून गेला. वंदे मातरम सारखं काव्य आपल्या लेखणीतून साकारणारे बंकिमचंद्र चॅटेरजी असो किंवा युवाशक्तीची मशागत करणारे स्वामी विवेकानंद. भारतीय संस्कृतीला नवं वळण देण्याचं काम इथल्या राष्ट्रपुरुषांनी केलं. मात्र स्वातंत्र्यानंतर इथल्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलून गेली. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. मात्र या देशाला झालेली फाळणीची जखम तशीच राहिली.(Marichjhapi Incident)

Marichjhapi Massacre 
 
पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस हिंदूंवर, शीखांवर अनन्वित अत्याचार केले जात होते. पूर्व पाकिस्तान अर्थात आताच्या बांगलादेशात सुद्धा परिस्थीती काही फार बरी नव्हती. धर्मांधांच्या छळाला कंटाळून तिथल्या अनेक हिंदूंनी पलायन केले. या निर्वासितांमध्ये वंचित समूहातील लोकांचा देखील सहभाग होता. पश्चिम बंगालमधील काँग्रेस सरकार या निर्वासितांचे पुनर्वसन करण्यात अपयशी ठरल्याचं बोललं गेलं. १९५० च्या दशकात, सरकारने या निर्वासितांना पुन्हा वसवण्यासाठी मध्य भारतातील 'दंडकारण्य' या प्रदेशात पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र तिथलं अपरिचित हवामान.(Marichjhapi Incident)
 
 
 दुष्काळ, खडकाळ जमीन अशा अनेक कारणांमुळे निर्वासितांनी पुन्हा एकदा बंगालची वाट निवडली. २५ जानेवारी १९७६ रोजी, 'डाव्या आघाडी'चे प्रमुख नेते ज्योती बसू यांनी, दंडकारण्यातील 'माना' निर्वासित छावणीजवळ असलेल्या भिलाई इथं एका जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी असं आश्वासन दिलं की, जर पश्चिम बंगालमध्ये डावी आघाडी सत्तेवर आली, तर ती या निर्वासितांना सुंदरबनमध्ये स्थायिक होण्याची परवानगी दिली. १९७७ साली डावी आघाडी सत्तेवर आली आणि १९७८ च्या सुरुवातीपासून निर्वासितांचे गट दंडकारण्यातून सुंदरबनमधील मारिचझापी बेटावर स्थायिक होऊ लागले. नमूद करण्या सारखी गोष्ट म्हणजे निर्वासित इथे येण्याआधी हे बेट म्हणजे एक निर्जन प्रदेश होते.(Marichjhapi Incident)
 
या बेटावर स्थायिक झालेले हिंदू आपआपल्यापरीने आयुष्य जगत होते. उदरनिर्वाहासाठी मासेमारी करणं, छोट्या छोट्या व्यवसायातून ही माणसं आपल्या आयुष्याचा गाडा ओढीत होती. मात्र अचानक एक दिवस हा परिसर पर्यावरणीय राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आणि इथल्या हजारो निर्वासितांचे भविष्य अंधारात लोटलं गेलं. निर्वासितांनी योग्य पुनर्वसनाची मागणी करूनही, सरकारने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली.(Marichjhapi Incident)
 
अशातच १९७९ चं वर्ष उगवलं ते या निर्वासितांची काळरात्र होऊनच. या काळात निर्वासितांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एक क्रूर मोहीम राबवली. अन्न, पाणी, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित करण्यात आला, ज्यामुळे बेटावर मोठ्या प्रमाणावर उपासमार, रोगराई आणि हालअपेष्टांचे थैमान माजले. तत्तकालीन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारी ते ११ मे १९७९ या काळात तत्तकालीन पोलीसयंत्रना आणि डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी हिंसक कारवाया केल्या, ज्यामध्ये हजारो निर्वासित मारले गेले.(Marichjhapi Incident)
 

WEST BENGAL 
 
या मोहिमेदरम्यान स्त्रिया, मुले आणि वृद्धांचीही हत्या करण्यात आल्याचा आरोप विविध अहवालांमध्ये करण्यात आला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे मृत आणि मरणासन्न अवस्थेतील लोकांचे मृतदेह मगरी किंवा वाघांचे भक्ष्य बनवण्यात आले. अपेक्षेप्रमाणे या बद्दलची सत्यता लोकांसमोर आली नाही. मात्र, या सगळ्या घटनेमध्ये हजारो निष्पाप हिंदू मारले गेल्याची चर्चा दबक्या आवाजात बंगालमध्ये होत राहिली. या संदर्भात खटला चालला नाही, चौकशी करण्यात आली नाही.(Marichjhapi Incident)
 
 
पत्रकारांनी ज्या वेळी यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना कधी रोखलं गेलं, तर कधी धमकवण्यात आलं. काळाच्या ओघात जनसामान्यांच्या स्मृतिपटलावरुन ही घटना पुसली गेली. मात्र म्हणतात ना, सत्य हे सूर्य प्रकाशाइतकं प्रखर असतं. अज्ञानाची, आणि अंधाराची काजळी कितीही दाट असली तरी एक दिवस सत्य लोकांसमोर येतंच. हळू हळू शैक्षणिक वर्तुळांमध्ये या विषयी लोकांनी बोलायला सुरुवात केली. २०१९ साली पत्रकार दीप हलदर यांनी 'ब्लड आयलंड: अ‍ॅन ओरल हिस्ट्री ऑफ द मारीचझापी मॅसॅकर' नावाचं पुस्तक लिहीलं. या पुस्तकाच्या माध्यमातून चर्चा सुरु झाली आणि आज याबद्दल काही प्रमाणात का होईना पण लोकं संवाद साधत आहेत. सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या लोकांना आज पराभावाचा सामना करावा लागतोय. देशविघातक शक्तींना बळ देणाऱ्या नराधमांना नाकारुन, लोकशाही आणि संविधानाच्या पाठीमागे बंगालची जनता उभी राहिली आहे. येणाऱ्या काळात टागोरांच्या भूमीमध्ये राष्ट्र प्रथम हा विचार पुन्हा एकदा रुजला जावा एवढीच अपेक्षा. पश्चिम बंगालच्या निवडणूकींबद्दल तुमची प्रतिक्रीया काय हे आम्हाला कमेंट बोक्समध्ये नक्की सांगा.(Marichjhapi Incident)