
कोलकाता : गेल्या 15 वर्षातील अन्यायाची राजवट बंगाली जनतेने उलथवून लावताना,
त्या अन्यायाचे नेतृत्त्व करणार्या ममता बॅनर्जी यांनाही धडा शिकवला आहे. प.
बंगाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भवानीपूर या ममता दीदींच्या पारंपारिक
मतदारसंघातून भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममती दीदी यांना धूळ चारली असून,
त्यांचा तब्बल 15 हजार 105 मतांनी पराभव केला आहे. सुवेंदू अधिकारी यांना 73
हजार 917 मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना 58 हजार 112 मते मिळाली.
प. बंगालमध्ये पंधरा वर्षापूर्वी डाव्यांकडून सत्ता घेतना मा माटी मानुषचे
स्वप्न बंगाली माणसाला ममता दीदी यांनी दाखवले होते. मात्र, गेल्या 15 वर्षांत
त्यांनी अराजकतेचे राज्याच बंगाली माणसाच्या पदरात टाकले. त्यामुळे या
विधानसभा निवडणुकीमध्ये बंगाली जनतेने ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठी फिरवली
असून, त्यांचा भवानीपूर या मतदारसंघातून पराभव झाला आहे.
मतगणना सुरु झाल्यापासून, ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी या लढतीकडे
देशाचे लक्ष लागले होते. मतगणनेच्या दरम्यान काहीकाळ ममता बॅनर्जी या पिछाडीवर
होत्या. मात्र, त्यानंतर साधारणपणे मतगणनेच्या 14 ते 15 व्या फेरीपर्यंत त्या
आघाडीवर राहिल्या. 16व्या फेरीमध्य सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी
यांच्यावर 554 मतांची आघाडी घेत, त्यांची बढत मोडून काढली. त्यानंतर 17
फेरीमध्ये ममता बॅनर्जी यांना फक्त 896 मते मिळाली,
त्याचवेळी सुवेंदू अधिकारी यांना 6 हजार 568 मतांचे दान बंगाली जनतेने केले.
यामुळेच सुवेंदू अधिकारी यांची ममता दीदी यांच्यावरील बढत अधिक पक्की झाली.
त्यानंतरच्या प्रत्येक फेरीमध्ये ही बढत वाढत गेली, शेवटच्या फेरीनंतर निवडणुक
आयोगाने सुवेंदू अधिकारी यांना 15 हजार 105 मतांनी जिंकल्याचे जाहीर केले.
भवानीपूर मतदारसंघ हा संमिश्र मतदारांचा असून, यात गुजराती, सिंधी, जैन,
मारवाडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. प्रचारादरम्यान, अमित शाह यांनी या
मतदारांबरोबर बैठका घेऊन, त्यांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते.
तसेच, डाव्यांमधील हिंदूंनीही ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कमळाला साथ
दिल्याची चर्चा या मतदारसंघात रंगली आहे.
बंगाली हिंदू जनतेने जिंकवले!
भवानीपूर मध्ये ममती दीदी यांना धूळ चारल्यानंतर माध्यमांना दिलेल्या
मुलाखतीमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी बंगाली हिंदू जनतेचे आभार मानले असून,
त्यांनी भरभरून दिलेल्या मतांच्या दानामुळेच माझा विजय सुनिश्चित झाल्याचे
म्हटले आहे. नंदीग्राम आणि भवानीपूर दोन्ही मतदारसंघात जनतेने दाखवलेल्या
यशाबद्दल सुवेंदू अधिकारी यांनी बंगाली जनतेचे आभारही मानले.