‘मामा-मियाँ’! दोन शब्दांवर भाजपने कसा खेचून आणला आसामचा विजयरथ?
04-May-2026
Total Views |
(Image Credit - Facebook Himanta Biswa Sarma)
नवी दिल्ली : आसाम विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा हे नॉर्थ ईस्टच्या राजकारणाचे किंग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य मतदारांची अचूक नस ओळखण्यात आणि हिंदू विरोधी शक्तींना चितपट करण्याची ताकद हिमंता बिसवा सरमा ठेवतात हे आजच्या निकालांनी अधोरेखित केले आहे.
भाजप ज्या प्रकारे आसाममध्ये हॅट्रीक रचत आहे, त्यावरुन दिल्ली ते गुवाहाटीपर्यंत सर्वच राजकीय विश्लेषकांना चकित करणारे आकडे हाती आले आहेत. एका ब्लॉकबास्टर हिंदी चित्रपटाला लाजवेल, अशी स्क्रिप्ट आसामच्या राजकारणाची ठरली आहे. केवळ दोन शब्दांच्या जोरावर ही निवडणूक मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी जिंकल्याची चर्चा आहे.
(Image Credit - Facebook Himanta Biswa Sarma)
एकीकडे मुख्यमंत्री हिमंता राज्यातील महिलांचे मामा बनले. ज्यामुळे महिलावर्गात त्यांच्याबद्दल प्रचंड आपुलकी निर्माण झाली. सहाजिकच महिलांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या पारड्यात मतं टाकली. आसामसारख्या राज्यात भाजपसाठी हे एक इमोशनल कार्डच बनले. दुसरीकडे त्यांनी ‘मियाँ पॉलिटीक्स’ उखडून फेकण्याचा निर्धार केला ज्यात प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विरोधकांना कुठल्याही प्रकारे त्यांना थोपविण्याचा मुद्दाच सापडला नाही. हिमंता यांच्या पत्नीविरोधात काँग्रेसने बनावट पासपोर्ट प्रकरणातील आरोप केले होते. मात्र, त्यावरही काँग्रेस नेते तोंडघशी पडले. परिणामी सत्तेच्या चाव्या पुन्हा भाजपला सुपूर्द केल्या आहेत.
(Image Credit - Facebook Himanta Biswa Sarma)
आसामच्या छोट्यातल्या छोटा कुटूंब सदस्य असो वा वयोवृद्ध आज्जी या सर्वांसाठी हिमंता ‘मामा’ बनले. राजकारणात बहुतांशवेळा राजकारणी स्वतःला जनतेचा सेवक किंवा प्रधान मानतात. मात्र, हिमंता यांनी स्वतःला मामा म्हणवत एक कौटुंबिक नाते मतदारांशी प्रस्थापित केले. या मामा ब्रॅण्डमुळे महिला वर्गाची एकगठ्ठा मते त्यांना पडली.
घरातील महिला जर समाधानी असतील तर ही हक्काची मतं ठरतात, ती कुठेच जाणार नाहीत. त्यांच्या अरुणोदयी २.० आणि अन्य डीबीटी योजनांमुळे महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग झाली. जेव्हा निवडणूका जवळ आली तेव्हा या योजनांचे बजेट आणि कालावधी वाढविण्यात आली. काँग्रेस या काळात महागाईच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत राहिली. मात्र, ग्रामीण भागातील महिलावर्गाने ‘मामा’ असलेल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या घरातील कुटूंबातील सदस्य मानले. या महिला सक्षमीकरणाच्या निर्णयामुळे हिंमता बिसवा सरमा प्रचंड लोकप्रिय ठरले.
(Image Credit - Facebook Himanta Biswa Sarma)
मियाँ पॉलिटीक्सला सुरुंग
मामा या शब्दांत तर आत्मियता होती मात्र, मियाँ शब्दाचा उच्चार हिमंता यांनी एका अस्त्रा सारखा केला. आसामची बदललेली डेमोग्राफी आणि बांगलादेशींची घुसखोरी हा एक संवेदनशील मुद्दा मानला गेला. त्यांनी आपल्या निवडणूकांच्या प्रचार रॅलीत थेटच या मुद्द्यांना हात घातला. आसामी संस्कृतीवर आघात करणाऱ्या मियाँ पॉलिटीक्सला त्यांनी लक्ष्य केले. हा मुद्दा प्रामुख्याने तिथल्या जनतेने उचलून धरला.
आपली जमिन वाचवायची असेल तर एक व्हा!
आपली जमिन आपली संस्कृती वाचवायची असेल तर इथल्या स्थानिकांनी एकत्र येणं गरजेचे आहे, हा त्यांनी मांडलेला नरेटीव्ह जोरदार चालला. मदरसे बंद करण्याचा, लॅण्ड जिहादविरोधात कठोर भूमिका घेण्याचा मुद्दा प्रखरतेने मांडला. काँग्रेस या मुद्द्यांवर प्रतिकारच करू शकली नाही. जिथे काँग्रेसने सेक्युलरीझमचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा हिमंता यांनी त्यांचा बुरखा फाडला.
विकासाची कास सोडली नाही
केवळ इमोशनल कार्ड खेळून उपयोग नाही, तर त्यांनी आपल्या कामातून रिझल्टही दाखवून दिले. त्यांनी स्वतःला विकासाभिमूख नेतृत्व म्हणून स्वतःला पुरस्कृत केले. रस्त्यांचे जाळे, नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, तरुणांना सरकारी नोकऱ्या आदी आश्वासनांची पूर्तता केली. डबल इंजिन सरकार असल्याने केंद्रातूनही भरभरून त्यांना निधी मिळत गेला.