Gokul Dairy Administrator Appointment : अखेर गोकुळवर प्रशासक ,अध्यक्षांसह पाच जणांची नियुक्ती

    04-May-2026
Total Views |
Gokul Dairy Administrator Appointment
 
मुंबई : (Gokul Dairy Administrator Appointment) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या संचालक मंडळाचा कालावधी संपल्याने आणि त्यांची पदे पुढे चालू राहू शकत नसल्याने व संघाच्या व्यवस्थापनात निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी तसेच दैनंदिन कामकाज करण्यासाठी अध्यक्षांसह एकूण पाच जणांचे प्राधिकारी अधिकारी मंडळ म्हणजेच प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.तसे आदेशाचे पत्र पुणे येथून सोमवार दि.४ मे रोजी राजकुमार पाटील,विभागीय उपनिबंधक,सहकारी संस्था ( दुग्ध), पुणे विभाग,पुणे यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Gokul Dairy Administrator Appointment)
 
या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून संजय कुमार सुद्रिक,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,सातारा तर सदस्य म्हणून प्रदीप मालगावे ,सहायक निबंधक,सहकारी संस्था ,चंदगड तसेच सुनील धायगुडे,सहायक निबंधक,सहकारी संस्था, मुळशी, व सागर बलकवडे,लेखा परिक्षक, श्रेणी २, अधीन विशेष लेखा परिक्षक वर्ग एक,सहकारी संस्था ,पणन , कोल्हापूर आणि चंद्रकांत परूळेकर,कक्ष अध्यक्ष,धर्मादाय रुग्णालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर हे काम पाहतील. (Gokul Dairy Administrator Appointment)
 
हेही वाचा :  Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवार तर, राहुरीत अक्षय कर्डिले यांचा दणदणीत विजय
 
१६ मार्च १९६३ साली स्थापन झालेल्या गोकुळला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून गोकुळकडे पाहिले जाते. इतिहासात प्रथमच गोकुळवर प्रशासक येत आहे. येणारी निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर केले आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा सूचनाही महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहेत. (Gokul Dairy Administrator Appointment)