मुंबई : (Buddhist Culture India) आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघाने महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या सहकार्याने २५६९ व्या वैशाख बुद्ध पूर्णिमेच्या निमित्ताने 'हिमालयीन बौद्ध धर्माचे भारत व जगातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशातील योगदान' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली. लेह येथील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरमध्ये पार पडलेल्या या परिषदेत भारतासह विविध देशांतील विद्वान, आध्यात्मिक नेते, धोरणनिर्माते आणि साधकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात भिक्षूंनी पारंपरिक मंगलपाठाने केली. त्यानंतर धार्मिक दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच आयबीसीचा ‘लद्दाख: हाय पासेसची भूमी’ हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. मुख्य अतिथी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि लद्दाख या भागांतील हिमालयीन बौद्ध धर्माच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला. अशा परिषदांमुळे हिमालयीन समुदायांमध्ये परस्पर संबंध दृढ होतात आणि शांती, सद्भाव व एकतेला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. तसेच दलाई लामांनी करुणा आणि एकता वृद्धिंगत करण्यात दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.(Buddhist Culture India)
कार्यक्रमाला उपस्थित विशेष अतिथी थुकसे रिन्पोछे यांनी आधुनिक जगात बौद्ध शिकवणींची उपयुक्तता अधोरेखित केली. भावी पिढ्यांसाठी हिमालयीन बौद्ध परंपरा जतन करताना अंतर्गत शांतता विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लद्दाख बौद्ध संघाचे अध्यक्ष त्सेरिंग लाक्रुक यांनी सिल्क रूटमार्गे लद्दाखमध्ये बौद्ध धर्माचा झालेला ऐतिहासिक प्रसार स्पष्ट केला आणि मठांची शिक्षण, ध्यान आणि संघर्षनिवारण केंद्रे म्हणून असलेली भूमिका अधोरेखित केली. यावेळी थुपस्तन नोरबू आणि ल्हुंडुप ग्याल्पो यांनी संकलित केलेल्या ‘तथागताची जिवंत परंपरा’ या पुस्तकाचे लद्दाख केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या वतीने प्रकाशन करण्यात आले.(Buddhist Culture India)
या परिषदेत प्राचीन वारसा संवर्धन, सांस्कृतिक व कलात्मक नवकल्पना तसेच बौद्धिक व नैतिक मूल्यांवर आधारित विविध विषयांवर सत्रे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये अनेक देशांतील विद्वानांनी सहभाग घेतला.(Buddhist Culture India)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक