सार्वजनिक ठिकाणी अवैध कत्तल, तसेच पशूंना आणून ठेवणे याबाबत मिरा-भाईंदरच्या त्या हिंदूंनी तीव्र आक्षेप घेतला. बकरे सोसायटीच्या बाहेर काढावेत म्हणून ‘विश्व हिंदू परिषद’अंतर्गत असलेल्या ‘बजरंग दला’च्या बजरंगीने शांतपणे ‘हनुमान चालीसा’ म्हणत शेवटी परमेश्वराच्या अवताराला ‘वराहा’लाच प्रकट केले! शेवटी सोसायटीमध्ये ठेवलेले ते ५० बकरे तिथून काढले गेले. इतकी वर्षे झाले नाही, ते वराहदेवाच्या आगमनाने झाले का? यासंदर्भात भाईंदरच्या ‘बजरंग दला’च्या वीर बजरंगींना भेटले. त्या भेटीत झालेल्या संवादाचा तपशील या लेखात मांडला आहे.
स्थळ : मिरा-भाईंदर...
वेळ : ‘बकरी ईद’च्या नावाने बकर्यांची कत्तल करण्याची!
काळ : हिंदूंनी ‘वराह’ आणल्यानंतर सोसायटीतून बकरे हटवण्याची!
तर अशी स्थळ-वेळ-काळाची युती नुकतीच जुळून आली होती. मिरा-भाईंदरच्या ‘पूनम क्लस्टर’मध्ये ५० ते ६० बकरे ‘कुर्बानी’साठी आणले होते. त्यांच्यासाठी सोसायटीच्या परिसरातच एक शेडही बांधली होती. ते बकरे तिथून हटवावेत म्हणून परिसरातील हिंदू बांधव एकत्र आले. शेड हटवली गेली. पण, बकरे तिथेच राहिले. "तुम्ही होळीला इतके रंग उधळता-खेळता, दिवाळीला फटाके उडवता, रांगोळी काढता, आम्ही काहीच म्हणत नाही. मग आमच्या बकर्यांच्या ‘कुर्बानी’ला तुमचा विरोध का?” असे बकरे आणणार्यांचे म्हणणे. पण, हे दरवर्षीचेच. सरकारने बकर्यांच्या ‘कुर्बानी’बाबत यावर्षी खरोखर कडक निर्देश दिले होते. निर्देशपालन न करणार्यांवर कडक कारवाईही होणार होती. पण, तरीही कायदे-नियम वगैरे वगैरे आमच्यासाठी नाहीत, हा भ्रम अनेकांमध्ये आहेच. त्यामुळे बकरे सोसायटीच्या परिसरातच राहिले. त्यांचा विशिष्ट वास, त्यांनी केलेली घाण हे सगळे सुरू होते.
बकरे आणणार्यांचे म्हणणे की, ते तीन-चार वेळा स्वच्छता करायचे. त्यांची पोरे या बकर्यांच्या सोबत खेळायची, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची. ते वेगळेच प्रकरण. त्यामुळे सोसायटीच्या परिसरात बकरे किती दिवस बांधणार? त्यांना सोसायटीत ठेवू नका, असा पवित्रा हिंदूंनी घेतला.
जिथे हिंदू आवाज देणार, तिथे ‘विश्व हिंदू परिषद’ आणि त्याअन्वये ‘बजरंग दल’ पोहोचणार नाही, असे कधी होणारच नाही. त्यामुळे मग तिथे मिरा-भाईंदर बजरंग दलाचे जिल्हा मंत्री नागनाथ कांबळे आणि स्थानिक बजरंग दलाचे ‘बजरंगी’ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. पण, बकरे आणणारे हट्टाला पेटले. ‘इधरीच रखेंगे, क्या करना हे करो!’ शेवटी बजरंगींनी ‘हनुमान चालीसा’ म्हणायला सुरुवात केली. सोसायटीच्या समोरच ठिय्या मांडून ते बसून राहिले. ते सोसायटीच्या आवारातही गेले नाहीत. कारण, सोसायटीच्या चेअरमनचे म्हणणे की, "आमच्या सोसायटीत सर्व सण साजरे करतात. त्यामुळे हा पण सण त्यांच्या पद्धतीने साजरा होणार.” (इमारती आणि सोसायटी, तसेच स्थानिक आस्थापनांमध्ये अध्यक्ष आणि पदाधिकारी होण्यासाठी अनेक लोक सातत्याने पुढाकार का घेतात, तर विशिष्ट प्रसंगी विशिष्ट निर्णय घेण्याचा अधिकार राहावा म्हणून, हे सत्यच आहे म्हणा!) तर, ‘बजरंगी’ रस्त्यावर ‘हनुमान चालीसा’ म्हणत होते. रणरणते ऊन आणि मनात स्वधर्म तेज! पाच तास झाले, हे सगळे सुरूच होते. शेवटी ‘बजरंगीं’च्या मनात कल्पना आली की, हे वर्षानुवर्षे चालले आहे. एकदा राक्षसाने पृथ्वीलाच पाताळात नेले, तेव्हा तिला परत आणण्यासाठी देवाने ‘वराह’ रूप घेतले होते.
जल में घुसी जो भू हर लाया|
तब प्रभू वराह रूप दिखाया॥
त्रैलोक्य जब संकट डोले|
तब वराह प्रभू रक्षा तोले ॥
मग तिथे उपस्थित असलेल्या सगळ्याच ‘बजरंगीं’नी ईश्वराच्या ‘वराह’ अवताराला पूजण्याचे ठरवले. ती कल्पना तत्काळ अमलात आणली गेली. इस्लाममध्ये वराहाला ‘हराम’ मानतात. त्यामुळे ‘बजरंगीं’नी तिथे वराह आणला, तर वातावरण चिघळेल, असे पोलिसांना वाटले. ते ‘बजरंगीं’च्या हातातला वराह घेऊन पळाले. पण, ‘बजरंगी’ही त्यांच्या पाठी पळाले. वराह खेचण्याचा प्रयत्न करू लागले. ‘बजरंगी’ आणि पोलीस या दोघांनाही कल्पना माहिती होती की, कितीही-काहीही झाले तरी दोघेही कायदा मोडणार नव्हते, ना फुकटची हिंसा करणार होते. हे सगळे पाहून बकरे आणणार्यांवर दडपण आले. ‘कुर्बानी’चे बकरे शेवटी सोसायटीच्या बाहेर आले.
तर, ‘बकरी ईद’च्या ‘कुर्बानी’साठी आणलेले बकरे सोसायटीतून अखेरीस हटवावे लागले. या घटनेच्या समर्थनार्थ आणि विरोधातही अनेक संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्यातल्या एका प्रातिनिधिक व्हिडिओमध्ये बकरे बाहेर काढावे लागले याचा विरोध करत, ती मुस्लीम तरुणी म्हणत होती, "बच्चो के लिये ही तो त्योहार होता हैं, बच्चे खुशीखुशी उनके साथ खेलते हैं, उनको लाड-प्यार करते हैं, उनकी खुशी छीन ली! जब सोसायटी से बच्चे निकाले, तो बच्चे कितने रोए.” थोडक्यात, ‘कुर्बानी’साठी आणलेल्या बकर्यांना सोसायटीच्या बाहेर नेले आणि मुलांना खेळायला मिळणार नाही म्हणून ते रडत होते, याचे तिला वाईट वाटले. पण, ज्याच्यासोबत खेळायचे, ज्याला जीव लावायचा, त्यालाच ‘कुर्बान’ करत ‘हलाल’ करायचे. भावनिक गुंतवणूक, जीव जडणे हे सगळे शून्य! मांस चिरणे, रक्ताचा पूर वाहणे, हे सगळे होताना त्या पशूच्या मरणयातना अनुभवणार्या किंचाळ्या, त्याच्या डोळ्यांतले ते भय, हे सगळे पाहणे यातून जी पिढी घडत असेल, ती कशी असेल? हा प्रश्न माझ्यासकट अनेकांना पडलेला आहे. ‘लव्ह जिहाद’चा बळी गेलेली रूपाली चंदनशिवे असो की, ‘सर तन से जुना’ म्हणत बळी गेलेले ते निष्पाप असोत, त्यांचा गळा चिरणार्यांना गळा चिरताना, रक्ताचे पाट वाहताना आणि बळींनी प्राणाची भीक मागताना काहीच वाटले नव्हते, हे सगळे आठवले.
असो. याच वेळी आणखी एक घटना घडली. ‘बजरंगीं’चे प्रतिनिधित्व नागनाथ कांबळे करत होते. अर्थातच, ‘बजरंग दल’, तसेच ‘विश्व हिंदू परिषदे’च्या वरिष्ठ पदाधिकार्यांचा समन्वय असणारच. तर, जेव्हा ‘बजरंगी’ ‘हनुमान चालीसा’ म्हणत होते, त्यावेळी गर्दीतून एक व्यक्ती पुढे आली. ‘बजरंगीं’ना म्हणाली, "नागनाथ कांबळे कोण आहे?” ती व्यक्ती नागनाथ कांबळे यांच्यावर चाकूचा हल्ला करणार इतक्यात, एका ‘बजरंगी’ने तो हल्ला स्वतःच्या हातावर झेलला. हे पाहून उपस्थित ‘बजरंगीं’नी त्या हल्लेखोराची म्हणजे अब्दुल रहीमची चांगलीच खातिरदारी केली. गर्दी, पोलीस याचा फायदा घेत तो पळून जात होता. पण, ‘बजरंगीं’नी त्याचा पाठलाग केला. त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सांगण्याचा उद्देश हाच की, हिंदू तरुण मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते. पण, आपण सहज त्यांच्यामध्ये जाऊन तिथे हल्ला करू आणि पळून जाऊ, इतका आत्मविश्वास त्याच्यामध्ये होता. तो असणारच. कारण, त्यांच्या मनात असणार की, "आम्ही हिंदूंवर ८०० वर्षे राज्य केले. त्यांना चिरडले, तर मेल्यावर जन्नत मिळेल.” पण, अब्दुलचा विश्वास खोटा ठरला. कारण, समोर हिंदू तरुण होते; पण ते ‘बजरंगी’ होते. त्यामुळे अब्दुलला चांगला चोप मिळाला आणि त्याला पोलीस कोठडीही मिळाली. कायदा आणि समाज दोघांनी त्यांचे काम चोख केले होते.
या घटनेतील ‘बजरंगीं’ना भेटले. भाईंदर जिल्हामंत्री नागनाथ कांबळे यांनाही भेटले. तिथे ‘बजरंगी’ही होते. धर्म-जाज्वल्यतेने ओतप्रोत असलेले ते तरुण! दुर्गेश जैसवाल, मोहित चौरसिया, हर्ष सिंग, बॉबी सिंग सुरज शाहू, शुभम गुप्ता, रोहन लोलेकर त्यांना विचारले, "नेमके ‘बकरी ईद’ला; बकरे आणले तेव्हाच तुम्हाला वराह आणायचे, कसे सुचले? जर वाद चिघळला असता तर?” यावर नागनाथ कांबळे अत्यंत शांत पण ठामपणे म्हणाले, "आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. त्यांनी घटनेत सगळ्यांना त्यांच्या धर्माच्या श्रद्धा पालन करायचा हक्क दिला. आम्ही पण आमच्या श्रद्धा पाळल्या बस. ‘बजरंगी’ म्हणजे वीर हनुमान. त्यांना प्रभू रामचंद्रांनी सांगितले नव्हते की, रावणाची लंका पेटव. पण, ते ‘बजरंगी’ने केले. एकाबरोबर चार चांगली कामे करण्याचा ‘बजरंगी’चा स्वभावच आहे. त्यामुळे शांतपणे ‘हनुमान चालीसा’ म्हणत असताना ‘बजरंगी’ने वराह का आणला? त्यामुळे काही अघटित झाले असते तर, हा प्रश्नच गौण आहे. जिथे ‘बजरंगी’ आहेत, तिथे हक्क, न्याय आणि धर्म जपण्यासाठी प्राणपणाने आणि सर्वतोपरी प्रयत्नाने काम होणारच होणार!”
तर, दुर्गेश जैसवाल यांचे म्हणणे, "आमच्या देवाचा अवतार आहे, ‘वराह’. आम्ही त्याची पूजा करण्यासाठी आणले होते. त्याचे चार-पाच दिवस लाड करून, त्याच्यावर खोटी माया करून वराहला कापण्यासाठी आणले नव्हते.” तसेच, मोहित चौरसिया म्हणाले, "आम्ही वराह आणले, तर इतकी चर्चा का? लोक कुत्री, मांजर, बकरे काय-काय पाळतात. पशू आणून त्यांची अवैध कत्तल करतात. आम्ही तर केवळ वराह आणले, यात इतके आश्चर्य करण्यासारखे किंवा वेगळे वाटण्यासारखे काही नाही. तसेच आम्ही कुणाला दाखवण्यासाठी काही केलेले नाही. आमच्या देवाचा अवतार आहे.”
धर्म, समाज आणि कायदा यांचे पुरेपूर ज्ञान असलेली ही ‘जेन-झी’ पिढी. यांनी एक हुंकार भरला, तर ‘झुरळ’ चिरडून जाईल, असाही विचार का कोण जाणे, मनात आला. वाटले, ‘हम कॉकरोच हैं’ म्हणणार्यांपेक्षा करुणा आणि न्याय, हक्क, श्रद्धेसाठी वराहाला त्या परिसरात आणणारे हे युवक नक्कीच राष्ट्रधर्मासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मनात जयघोष घुमला, ‘जयकारे वीर बजरंगी, बोलो हर हर महादेव!’
हिंदू-हितासाठी सदैव तत्पर ‘विश्व हिंदू परिषद’
‘महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट’च्या नियमानुसार आणि भारतीय कायद्यानुसार अवैध कत्तल करणे, हा गुन्हा आहे. राहत्या परिसरात आणि घरातही पशूंची/बकर्यांची ‘कुर्बानी’ देऊ शकत नाही. धर्मप्रेमी ‘बजरंगी’ निडरपणे मिरा-भाईंदरमध्ये कार्य करतात. त्यानुसार, धर्माचे नाव घेत अधर्म करणार्यांना, हिंदूंच्या हिताला, हिंदूंच्या श्रद्धेला दुखावणार्यांची ‘विश्व हिंदू परिषद’ कधीच गय करणार नाही. हिंदू-हितासाठी ‘विश्व हिंदू परिषद’ तत्पर आहे.
श्रीराज नायर,
राष्ट्रीय प्रवक्ता, ‘विश्व हिंदू परिषद’