विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी – रामदास आठवले

फुगेवाडी-दापोडीतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट; अवैध दारू व्यवसायाविरोधात कारवाईचे आवाहन

    31-May-2026   
Total Views |
Toxic Liquor Incident
 
पुणे : (Toxic Liquor Incident) फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्ष (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
 
“विषारी दारूमुळे झालेले मृत्यू अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाकडे केवळ दुर्घटना म्हणून पाहता येणार नाही. अवैध हातभट्टी व्यवसाय चालविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,” असे आठवले यांनी म्हटले.
 
यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर तसेच रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. घटनेत मृत्यू पावलेले बहुतांश युवक ३० वर्षांखालील असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पक्ष कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाची माहिती तात्काळ पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहनही आठवले यांनी केले. संबंधित यंत्रणांनी अशा प्रकरणांवर तातडीने कारवाई करून अवैध हातभट्ट्यांवर आळा घालावा, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली. (Toxic Liquor Incident)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.