भाजयुमो, मुंबईतर्फे २०० हून अधिक ठिकाणी ‘मन की बात - फर्स्ट टाइम वोटर्स’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

    31-May-2026
Total Views |
Man Ki Baat
 
मुंबई : (Man Ki Baat) भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे विशेष आयोजन मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वात मुंबईभर २०० हून अधिक ठिकाणी रविवार दि.३१ रोजी करण्यात आले.
 
या विशेष अभियानामध्ये प्रथमच मतदान करणाऱ्या युवा मतदारांना (फर्स्ट टाइम वोटर्स) जोडण्यावर विशेष भर देण्यात आला. मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रे व मंडळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकत राष्ट्रनिर्माणातील आपल्या भूमिकेबाबत सकारात्मक संवाद साधला.
 
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मंडळ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
 
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह (Man Ki Baat) म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’ हे केवळ रेडिओवरील कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी नागरिकांना, विशेषतः युवकांना राष्ट्रनिर्माणाशी जोडणारे एक लोकचळवळीत रूपांतरित झाले आहे.यंदा भाजयुमो मुंबईने विशेषतः आगामी निवडणुकांमध्ये प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचे भविष्य जागरूक मतदान, सामाजिक सहभाग आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या विचारांवर अधिक मजबूत होणार आहे.”
 
पुढे दीपक सिंह (Man Ki Baat)म्हणाले की, “मुंबईतील २०० हून अधिक ठिकाणी झालेल्या या व्यापक अभियानातून हे स्पष्ट झाले आहे की देशातील युवा वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या दूरदृष्टीवर आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. आजचा युवा केवळ प्रेक्षक नसून परिवर्तनाचा सक्रिय भागीदार बनू इच्छितो.”(Man Ki Baat)