महायुतीचे ठरले , राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नावाने गोकुळ साठीच्या निवडणूक पॅनलची घोषणा
31-May-2026
Total Views |
मुंबई : (Gokul Election) "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा सगळ्यांना एकत्र करून महायुती करायची असे सांगितले होते. राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी या नावाने महायुतीतल्या घटकांनी गोकुळ निवडणुकीसाठी एकत्र यायचे ठरवले आहे.मधल्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावनाबद्दल जे प्रतिबिंब उमटले होते. आणि गोकुळ निवडणुकीत महायुती एकत्र येणार की नाही असं वातावरण तयार झाले होते. पण या सगळ्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे." अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
गोकुळ निवडणुकीसंदर्भात (Gokul Election) महायुतीच्या पॅनलबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी शनिवार दि. ३० रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक कोल्हापूर येथे बोलवण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या वतीने आमदार विनय कोरे बोलत होते.
"प्रत्यक्ष आज निवडणुकीची सुरुवात झाल्यानंतर निवडणूक कशा पद्धतीने पुढे न्यायची याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हा सगळ्यांना आज एकत्र बोलावले होते. निवडणुकी संदर्भात व महायुती संदर्भात आम्हा सगळ्यांची नियोजनाबाबत अतिशय चांगली चर्चा झाली असून आम्ही सर्व एकसंघपणे गेल्यावर जिल्ह्यामध्ये किती चांगले चित्र निर्माण होऊ शकते हे दिसेल.
मधल्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावनाबद्दल जे प्रतिबिंब उमटले होते. आणि निवडणुकीत महायुती एकत्र येणार की नाही असं वातावरण तयार झाले होते. पण या सगळ्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजण निवडणुकीला सामोरे जायचे ठरवले आहे." असेही विनय कोरे म्हणाले.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ,खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक ,आमदार विनय कोरे उपस्थित होते. (Gokul Election)