इराण आणि अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधी 60 दिवसांसाठी वाढणार!

    30-May-2026
Total Views |
Iran war news
 
वॉशिंग्टन : (Iran war news) इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धातील शस्त्रसंधी 60 दिवसांसाठी वाढवण्यावर आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चेची नवीन फेरी सुरू करण्यावर तात्पुरता करार झाला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स यांनी याबाबत माहिती दिली.
 
जवळपास गेले 80 दिवस सुरु असलेल्या युद्धामध्ये तोडगा निघाला नसून, शस्त्रसंधी 60 दिवसांनी वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचे समोर आले आहे. तसेच, इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतही नव्याने चर्चा उभय पक्षांमध्ये सुरु होणार आहे. या कराराबाबत बोलताना जे डी व्हान्स म्हणाले की, दोन्ही देशातील कराराला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नेमकी परवानगी कधी देतील याबाबत साशंक असल्याचेही व्हान्स म्हणाले.
 
 
अलीकडेच, दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या आक्रमणामुळे दोन्ही देशांतील युद्ध पुन्हा भडकण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, या झालेल्या करारामुळे पुन्हा एकदा शांतीवार्ता शांततेत सुरु राहण्याची अपेक्षा जागतिक समुदायाकडून व्यक्त केली जात आहे.(Iran War News)