अवैध घुसखोरीवर निर्णायक प्रहार! बंगालमध्ये बांगलादेशींची मोठी धरपकड

११ होल्डिंग सेंटरमध्ये ३८६ संशयित ताब्यात

    30-May-2026   
Total Views |
Bangladesh Illegal Immigration
 
मुंबई : (Bangladesh Illegal Immigration) पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. राज्यभर उभारण्यात आलेल्या होल्डिंग सेंटरची संख्या अवघ्या एका आठवड्यात वाढून ११ वर पोहोचली आहे. या केंद्रांमध्ये सध्या सुमारे ३८६ संशयित बेकायदेशीर स्थलांतरितांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर वैध कागदपत्रांशिवाय सीमेपार ये-जा करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात असून, त्यांच्या ओळखीची सविस्तर पडताळणी केली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले.(Bangladesh Illegal Immigration)
 
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी टेटुलिया, चारघाट आणि मीडिया या भागांत तीन नवीन होल्डिंग सेंटर सुरू करण्यात आले. या तीन केंद्रांमध्ये एकूण ३३५ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये स्वरूपनगर येथील हकीमपूर सीमा चौकीजवळ पकडण्यात आलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. हे लोक कथितरित्या बांगलादेशात परत जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आले होते. बांगलादेश सीमेलगत असलेले बसीरहाट आणि बनगाव हे दोन पोलीस जिल्हे संयुक्तपणे पाच होल्डिंग सेंटरचे संचालन करत आहेत.(Bangladesh Illegal Immigration)
 
तपासादरम्यान असेही उघड झाले आहे की, काही व्यक्तींनी कथितरित्या लाच देऊन भारतीय ओळखपत्रे मिळवली होती. यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रांचा समावेश आहे. मात्र, हे लोक सीमेपार जाण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले तेव्हा त्यांच्याकडे प्रामुख्याने बांगलादेश सरकारने जारी केलेली ओळखपत्रे आढळून आली. सुरक्षा यंत्रणा आता या प्रकरणांचा सखोल तपास करत असून सीमा सुरक्षा अधिक बळकट करणे आणि बेकायदेशीर घुसखोरी रोखणे यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.(Bangladesh Illegal Immigration)
 
होल्डिंग सेंटरमध्ये कोणत्या सुविधा आहेत उपलब्ध?
 
ताब्यात ठेवलेल्या व्यक्तींना अन्न, वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक सेवा पुरवल्या जात आहेत. तसेच त्यांच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, ताब्यात घेण्यात आलेल्या बहुतेक व्यक्ती पाच ते दहा वर्षांपूर्वी बेकायदेशीररीत्या भारतात दाखल झाल्या होत्या. तर काही जण सात ते आठ महिन्यांपूर्वीच सीमा ओलांडून भारतात आल्याचे निष्पन्न झाले आहे.(Bangladesh Illegal Immigration)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक