Prakash Abitkar statement : संचालक मंडळाची मुदत संपल्यावर प्रशासक येणं ही औपचारिक बाब आहे - प्रकाश आबिटकर
03-May-2026
Total Views |
मुंबई : (Prakash Abitkar statement) "संचालक मंडळाची मुदत संपल्यावर प्रशासक येण ही औपचारिक बाब आहे.कायद्यात बदल झाला म्हणून हा प्रशासक आहे. गोकुळची निवडणूक सुरू होणार आहे त्यामुळे प्रत्येकाची मत मतांतर आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत.पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सक्त सुचना आहेत की महायुती म्हणून एकत्रीत काम करून निवडणूक यशस्वी करायची आहे.त्यामुळे पुढच्या टप्प्यात तुम्हाला बदल दिसेल." असे वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवार दि.१ रोजी केले आहे.
"गोकुळबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय देतील तो मान्य आहे.मी महायुतीचा मंत्री आहे.एक घटक आहे त्यामुळे १२ न्हवे १३००० वेळा म्हणालो असेन की गोकुळमध्ये महायुतीच पॅनल मी करणार.शेवटी एकच आणि शेवटच सांगतो गोकुळच्या निवडणूकीचा ज्यावेळी निकाल लागेल तेव्हा मी गुलाल लावून सविस्तर प्रतिक्रीया देईन."असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवार दि.२ रोजी केले आहे.(Prakash Abitkar statement)
तर गोकुळ दूध संघावर प्रशासक म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे केली जाणार आहे. तसेच गोकुळच्या ताराबाई पार्क, गोकुळ शिरगाव आणि मुंबई येथील कार्यालयाना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.(Prakash Abitkar statement)
गोकुळ वर शासकीय की अशासकीय प्रशासक येतो हे अजून समजले नसले तरी प्रशासक म्हणून शौमिका अमल महाडिक, प्रकाश बेलवाडे, माणिक पाटील चुयेकर यांचीदेखील नावे चर्चेत आहेत.(Prakash Abitkar statement)