Nasarapur Minor Case : आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येणार-राज्य बाल हक्क आयोग अध्यक्ष संजय पुराणिक

    03-May-2026
Total Views |

Nasarapur Minor Case
 
मुंबई : (Nasarapur Minor Case) "नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आणि संतापजनक आहे. या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार आहे." अशी माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे. (Nasarapur Minor Case)
 
"आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी यासाठी विशेष सरकारी वकिलामार्फत संपूर्ण प्रयत्न करण्यात येणार असून महिला व बालविकास विभागाच्या वतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला आर्थिक व मानसिक सहाय्य दिले जाणार आहे, त्यासाठीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.या कठीण प्रसंगी राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे."असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून मंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.(Nasarapur Minor Case)
 
 
"नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आणि संतापजनक असून या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. पीडित बालिकेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा व्हावी." यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. (Nasarapur Minor Case)