Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड

    03-May-2026
Total Views |
Maharashtra Olympic Association
 
मुंबई : (Maharashtra Olympic Association) महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी केंद्रीय नागरी विमानवाहू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची रविवार दि.३ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरहे पद रिक्त झाले होते त्या जागी मोहोळ यांची वर्णी लागली आहे.यापूर्वी अजित पवार यांनी तब्बल १३ वर्षे हे अध्यक्षपद भूषवले होते.तर यापूर्वी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी मुरलीधर मोहोळ यांनी काम केले आहे.
 
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची कार्यकारणीची बैठक व सर्वसाधारण सभा संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती स्टेडीयम बालेवाडी येथे रविवार दि.३ रोजी संपन्न झाली.यावेळी मुरलीधर मोहोळ यांची सर्वानुमते महाराष्ट्र ऑलिंपिक असोससिएशनचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.(Maharashtra Olympic Association)
 
हेही वाचा :  Mumbai Pune Connecting Link : सेल्फी' साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका; सीसीटीव्हीची २४x७ नजर राहणार
 
यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे की,"महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन!आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला निश्चितच नवी झळाळी आणि भरारी मिळेल. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! "यावर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी प्रतिक्रिया दिली.(Maharashtra Olympic Association)